Rajasthan Viral Video (Photo Credits-IANS)

Rajasthan:  देशात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा दिवसागणिक वाढत चालला आहे. त्यामुळे विविध राज्यातील आरोग्य विभागावर मोठा ताण पडत चालला आहे. तसेच नागरिकांना सुद्धा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या परिस्थितीत अधिक काळजी घ्यावी असे वारंवार सांगितले जात आहे. सर्वत्र लॉकडाऊन ही लागू केला आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करत गरज भासल्यास घराबाहेर पडावे असे आवाहन करण्यात येत आहे. तरीही अद्याप काही ठिकाणी नियमांचे उल्लंघन केल्याने पोलिसांकडून चांगलीच अद्दल घडवली जात आहे. अशाच प्रकारचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये पोलिसांनी चक्क नागिन डान्स करायला लावला आहे.(Delhi: मोदीजी आमच्या मुलांची कोरोनाची लस विदेशात का पाठवली? अशी पोस्टरबाजी करणाऱ्या 15 जणांना अटक तर 17 लोकांच्या विरोधात FIR दाखल)

व्हायरल झालेला व्हिडिओ हा जालंधर जिल्ह्यातील आहे. येथे पोलिसांनी विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर कारवाई केली आहे. त्यावेळी पोलिसांनी दोन तरुणांना नागिन डान्स करायला लावला असून त्याचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. लॉकडाउनच्या नियमांचे उल्लंघन केल्याने त्यांना असा डान्स करायला लावल्याचे सांगण्यात आले आहे .(काय सांगता? Covid-19 ला देवी समजून महिला करत आहेत 'कोरोना माई'ची पूजा; श्रद्धाळूंचा 21 दिवस पूजेचा संकल्प)

Tweet:

दरम्यान, भारतात कोरोनाचे आणखी 2,81,386 रुग्ण आढळले असून 3,78,741 जणांना डिस्चार्ज दिला गेला आहे. तसेच गेल्या 24 तासात 4106 जणांचा बळी गेल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. देशात सध्या 2,49,65,463 कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत. एकूण 2,11,74,076 रुग्णांना डिस्चार्ज दिला गेला असून एकूण 2,74,390 जणांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण 18,29,26,460 लसीकरण झाले आहे.