Viral Video : मिटिंगमध्ये अचानक आला साप आणि....
बँकेची मिटिंग आणि साप (Photo Credit : Facebook)

सापाचे नाव जरी काढले तरी अनेकांच्या अंगावर काटा येतो, घाबरगुंडी उडते. अशातच जर ऑफिसच्या मिटिंगमध्ये साप घुसला तर? कल्पनाही न करवणारी ही घटना चीनमधील एका मिटींग रुममध्ये घडली आहे. चीनमध्ये एका बँकेतील अधिकारी एका हॉलमध्ये चर्चा करत होते. त्यावेळी अचानक छतावरून एक भलामोठा अजगर खाली पडतो आणि उपस्थितांची तारांबळ उडते. या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

या व्हिडिओत काही अधिकारी उभे राहुन चर्चा करत असताना दिसत आहेत. त्यावेळी अचानक एका अधिकाऱ्याजवळ छतावरून एक अजगर खाली पडतो आणि सर्वांचीच धावपळ होते.

पाहा व्हिडिओ...

ही घटना घडल्यानंतर वन्यजीव अधिकाऱ्यांना बोलविण्यात आले. त्यांना सापाला पकडण्यात यश आले.