कोरोना व्हायरसच्या संकटकाळामध्ये लॉकडाऊनचा वेळ घालवण्यासाठी नेटकर्यांनी चॅलेंजेस सुरू केली होती. मज्जा मस्तीमध्ये जुन्या आठवणींना उजाळा देत कधी जुने तर कधी नवे फोटो क्लिक करत अनेक पोस्ट शेअर केल्या आहेत. दरम्यान सध्या सोशल मीडियामध्ये Couple Challenge चा बोलबाला आहे. यामध्ये जोडपी आपल्या साथीदारासोबतचा फोटो पोस्ट करत आहेत. पण या लव्ही डव्ही चॅलेंजमध्ये सायबर क्राईमचा देखील धोका आहे. पुणे पोलिसांनी नेटकर्यांना हाच धोका लक्षात आणून देत दक्ष राहण्याच्या सूचना केल्या आहे. Couple Challenge on Social Media: कपल चॅलेंजवर सिंगल्स कडून भन्नाट मीम्स आणि जोक्स शेअर! (See Post).
ट्वीटरच्या माध्यमातून पोस्ट करताना पुणे पोलिसांनी इशारा दिला आहे की, ‘कपल चॅलेंजवाल्यांना सायबर क्रिमिनल चँलेंज न करो, केला तर कपलचा खपल चँलेंज होईल'. यावेळीच त्यांनी फोटोचा गैर फायदा घेत मॉर्फिंग करून ते पॉर्न साईट साठी किंवा इतर चूकीच्या गोष्टींसाठी वापरले जाऊ शकतात असं म्हणत सावध रहा असे म्हटले आहे.
पुणे पोलिस ट्वीट
Think twice before you post a picture with your partner. A 'cute' challenge can go wrong if not cautious! #BeAware pic.twitter.com/oJkuYdlBWZ
— PUNE POLICE (@PuneCityPolice) September 24, 2020
कपल चॅलेंजची नेमकी सुरूवात कुठून आणि कशी झाली याची काही ठोस माहिती उपलब्ध नाही. परंतू सध्या लॉकडाऊन आणि कोरोना व्हायरसला कंटाळलेल्या अनेकांनी सोशल मीडियामध्ये सुरू झालेल्या या रोमॅन्टिक चॅलेंजमध्ये सहभाग घेतला आहे. मात्र तुमचे फोटो सुरक्षित ठेवा. त्याचा गैरफायदा होत नाही ना? याची काळजी घ्या.