Pune Bride| PC: Twitter/ANI

लग्न सोहळे आले की बॅन्ड बाजा बारात येते पण पुण्याच्या एका नवरीने यामध्ये शिखरचं गाठलं आहे. पुण्यात 23 वर्षीय नवरीने चक्क एसयूव्ही कार च्या बोनेट वर बसून लग्नमंडपाकडे कूच केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडीयात व्हायरल झाला आहे. यामध्ये नवरी सोबतच गाडीतील इतर वर्‍हाडी देखील मास्क न घालता आल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. बोनेट वर बसून या नवरीचं फोटोशूट देखील झाल्याने त्यावर मोटार व्हेईकल अ‍ॅक्ट अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या सार्‍या प्रकराचा व्हीडीओ सोशल मीडीयात वायरल झाल्याने पोलिसांना देखील तिचा शोध घेणं सुकर झाले.

नवरीचं फोटोशूट पुणे-सासवड रोड वरील दिवे घाटात झालं तर लग्नाचा सोहळा सासवड भागात होता. या प्रकारामध्ये कोविडच्या नियमांचं उल्लंघन केल्यासोबतच नवराईचं चालत्या गाडीवर बसून फोटोशूट झाल्याने, तिच्यासोबत ज्या व्हिडीओग्राफरने हा प्रकार केला तो व्यक्ती, गाडीचा चालक यांच्यावर देखील पोलिसांनी संबंधित कलमांर्तगत गुन्हे दाखल केले असल्याची माहिती पोलिस अधिकार्‍यांनी मीडीयाशी बोलताना दिली आहे. नवरदेवाच्या घोड्यावर चढून तरुणाचा जबरदस्त नागिन डान्स; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल (Watch Video).

नवरीच्या फोटोशूटचा वायरल व्हिडीओ

महाराष्ट्रातील कोरोना परिस्थिती पाहता लग्न सोहळे साधेपणाने साजरे करण्याचे आवाहन सरकार कडून करण्यात आले आहे. तसेच नवरा-नवरी सह उपस्थितांच्या संख्येवरही मर्यादा घालण्यात आली आहे. त्यामुळे अशाप्रकारे नियम मोडणार्‍यांवर प्रशासनाकडून तातडीने कारवाई केली जात आहे.