भारताला नृत्यकलेची खास परंपरा आहे. भारतातील विविध नृत्य प्रकार देखील खूप प्रसिद्ध आहे. पण लग्नातील डान्सची एक हटके स्टाईल असते. लग्न, वरात आणि डान्स नाही, असे होणे, भारतात तरी अशक्यच. वरातील खास आणि लक्षवेधी ठरणारा डान्स फॉर्म म्हणजे नागिण डान्स. तुम्ही आता पर्यंत नागिण डान्स वेगवेगळे व्हिडिओज पाहिले असतील. पण आता सोशल मीडियावर आलेला हा नागिण डान्स व्हिडिओ पाहून तुम्ही हसून हसून लोटपोट व्हाल.
या व्हिडिओत एक तरुण उत्साहाच्या भरात चक्क नवरदेवाच्या घोडीवर जावून बसतो आणि तिथे आपला नृत्याविष्कार दाखवू लागतो. त्याच्या हा डान्स पाहून वऱ्हाडी त र एन्जॉय करत आहेत. पण तुम्हालाही डान्स हसायला भाग पाडेल.
एका ट्विटर युजरने हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत युजर्सने 'अजगर डान्स' असे लिहिले आहे.
पहा व्हिडिओ:
Indian Marriages without Nagin Dance is boring.
But this is extravaganza. 🐍 pic.twitter.com/J6jqNT6iTM
— Godman Chikna (@Madan_Chikna) May 11, 2019
सोशल मीडियावर हा व्हिडिओ जबरदस्त व्हायरल होत आहे. या व्हिडिओला हजारो लाईक्स मिळाले असून युजर्स या व्हिडिओचा पुरेपूर आनंद घेत आहेत.