जगभरातील अनेक देशांमध्ये ऑनलाईन माध्यमातून अश्लील सामग्री म्हणजेच पॉर्न कंटेंट पुरवणारे संकेतस्थळ Pornhub सध्या मोठ्या अडचणीचा सामना करत आहे. पॉर्नहब वेबसाईट सेक्स ट्रॅफीकिंग आणि चाईल्ड रेप पॉर्न सामग्री प्रसारीत करत असल्याचा आरोप या संकेतस्थळावर करण्यात येत आहे. तसेच संकेतस्थळावरुन प्रसारीत होणारी दृकश्राव्य सामग्री छाननी धोरण अत्यंत कुचकामी आहे. त्यामुळे हे संकेतस्थळ बंद करण्यात यावे अशी मागणी जोर धरत आहे. अशी मागणी करणारी एक याचिकाही दाखल झाली असून, या याचिकेला पाठिंबा देत त्याबाबतच्या पत्रावर लाखो लोकांनी स्वाक्षरी केली आहे.
लैंगिक तस्करी आणि बाल बलात्काराचे व्हिडिओ प्रसाररीत केल्याबद्दल पॉर्नहबच्या अधिकाऱ्यांना जबाबादार धरावे अशी मागणी या याचिकेत केली आहे. पॉर्नहब बंद करण्यासाठी या याचिका एंटी-ट्रॅफिकिंग तज्ज्ञ लैला मिकेलवाइट यांनी सुरू केली होती. लैला मिकेलवाइट यांनी म्हटले आहे की, पोर्नहबवर अनेक लैंगिक तस्करी आणि बाल बलात्काराबाबत सामग्री प्रसारित केली जाते. अलिकडेच सामान्य नागरिकांनीही पॉर्न हब बंद करण्याची मागणी केली होती, तेव्हाही पॉर्नहब अडचणीत आली होती.
याचिकेत असे नमूद केले आहे की पोर्नहबवर बहुतेक व्हिडिओंमध्ये असे चित्रित केले गेले आहे की, 13 वर्षांच्या मुली खूप सुंदर दिसतात. या किशोरवयीन मुली विनामेकअप, अत्यंत तरुण, निष्पाप चेहऱ्याने हाता डेडी बिअर घेऊन अथवा लॉलिपॉप चाटत अत्यंत आक्रमकपणे आणि मादक वर्तन करताना दिसतात. तसेच सर्चमध्ये येण्यासाठी “teen” “Young Girl Tricked,” “Innocent Brace Faced Tiny Teen F---ed,” “Tiny Petite Thai Teen,” “Teen Little Girl First Time,” असे किवर्ड अथवा शब्द वापरले जातात. हे गेले प्रदीर्घ काळ सुरु आहे. (हेही वाचा, Porn Star Renee Gracie चे Sex Videos घालत आहे OnlyFans वर धुमाकूळ; जाणून घ्या या Hot XXX Star चे खरे Instagram, Facebook आणि Twitter खाते)
याचिकेत नमूद केल्याप्रमाणे धक्कादायक असे की, एक अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली होती. पुढे एक वर्षानंतर तिचा व्हिडिओ पॉर्नहबवर सापडला. पॉर्नहबवर तिच्यावर बलात्कार आणि लैंगिक अत्याचार केल्याचे 58 व्हिडिओ समोर आले होते. तर तिची तस्करी करणारी व्यक्ती तिच्याबरोबर व्हिडिओमध्ये दिसली होती. (व्हिडओ फुटेज/पाळत ठेवण्याचे फुटेज वापरुन ओळखले जाते) आता त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे हे सर्व पॉर्नहबमध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या नाकाखाली चालते.