इंटरनेटवर पॉर्न व्हिडिओवर बंदी घालणे हे सरकारसाठी आव्हान बनले आहे. कारण गेल्या वर्षात ऑक्टोबर महिन्यात भारत सरकारकडून Pornhub सह अन्य 957 पॉर्न बेवसाईट्सवर बंदी घालण्यात आली. युजर्सला सरकारचा हा निर्णय न पटल्याचे ही दिसून आले. तर सध्या युजर्सने VPN च्या माध्यमातून पॉर्न बेवसाईट्स वापरण्यास सुरुवात केली आहे. या प्रकरणी पॉर्न पाहणाऱ्या युजर्सची संख्या आता 400 टक्क्यांपेक्षा अधिक झाली आहे. हायकोर्टाचा आदेश मानत सरकारने 857 पॉर्न साईट्सवर बंदी घातली. त्यामध्ये आक्षेपार्ह आणि लैंगिक छायाचित्रे दाखण्यातय येत होती. त्यानंतर डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशने देशातील प्रमुख सर्विस प्रोव्हायडर्स यांना पत्र लिहित या वेबसाईट्सचा एक्सेस बंद करण्याचे निर्देशन दिले होते. पत्रात असे लिहिले होते की, पॉर्न वेबसाईट्सवर दाखवण्यात येणारे व्हिडिओ हे कलम 19(2) च्या अंतर्गत अनैतिक आणि अश्लील आहे.
पॉर्न वेबसाईट्सवर बंदी घातल्यानंतर रिलायन्स जिओ, एअरटेल, वोडाफोन-आयडिया यांनी सुद्धा पॉर्न वेबसाईटचा एक्सेस त्यांच्या नेटवर्कवरुन बंद केला आहे. दुसऱ्या बाजूला युजर्स सध्या VPN,प्रॉक्सी आणि अन्य टुल्स वापरुन बंद केलेल्या वेबसाईट्सचा एक्सेस मिळवत आहेत. मोबाईलवरुन VPN पद्धतीने पॉर्न डाऊनलोड केलेल्या संख्येत 405 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तसेच पॉर्न पाहणाऱ्या युजर्सची देशातील संख्या 57 मिलियनवर पोहचली आहे. ही आकडेवारी लंडनच्या एका वीपीएन रिव्हू फर्म Top10VPN यांनी जारी केली आहे. तसेच ऑक्टोबर 2019 ते ऑक्टोबर 2019 या दरम्यान गुगल प्ले स्टोअर आणि अॅपल अॅप स्टोर वरुन डाऊनलोड करण्यात आलेल्या वीपीएन मोबाईल अॅपवर आधारित आहे.(How To Increase Sex Time: या सध्या उपायांनी करा जास्त वेळ सेक्स; पार्टनरला द्या दुप्पट मजा)
रिपोर्टमध्ये असे सांगण्यात आले आहे की, भारतात जास्तकरुन वीपीएन सर्विस फ्री आहे. त्यामुळे युजर्सचा डेटा चोरी करुन सहज विकला जातो. देशातील 1 करोड 10 लाख युजर्स फ्री टर्बो वीपीएनचा वापर करतात. तर 70 लाख युजर्स सोलो वीपीएन आणि हॉटस्पॉट शील्ड फ्रीला पसंदी देतात. पेड सर्विस बाबत बोलायचे झाल्यास 1 करोड 80 लाख युजर्स सह एक्सप्रेस वीपीएन टॉपवर राहिला आहे.