How To Increase Sex Time: या सध्या उपायांनी करा जास्त वेळ सेक्स; पार्टनरला द्या दुप्पट मजा
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Pixabay)

स्त्री, पुरुषांसह प्रत्येक जीवाला शारीरिक सुखासाठी सेक्सची (Sex) गरज असते.  मात्र प्रत्येक टप्प्यावर, प्रत्येक वेळी ही गरज आपल्या जोडीदाराकडून पुरेशा प्रमाणात पूर्ण होईल असे नाही. म्हणजेच दोघांनाही सेक्स करण्याचा मूड असतो मात्र काहीवेळा ही कृती कधी सुरु होते आणि कधी संपते हे कळतच नाही. अनेकवेळा सेक्स टाईम (Sex Time) हा फार कमी असल्याने पार्टनर खुश राहू शकत नाही, त्यामुळे चिडचिड वाढून नात्यात खटके उडतात. कधी कधी आपली सेक्सची गरज पूर्ण करण्यासाठी घराबाहेर पर्याय शोधले जातात. हे सर्व टाळण्यासाठी सर्वात आधी तुमचा सेक्स टाईम कसा वाढेल याकडे लक्ष द्या, त्यासाठी काही टिप्स आम्ही सांगत आहोत.

सर्वात प्रथम लक्षात घ्या जास्त वेळ संभोग म्हणजे उत्तम आनंद, ही कल्पना डोक्यातून काढून टाका. तुम्ही किती वेळ सेक्स करता त्यापेक्षा तो कसा करता यावर आनंद अवलंबून असतो.

> सेक्सला सुरुवात करण्याआधी आपल्या पार्टनरची मानसिकता ओळखा. समोरच्या व्यक्तीला काय हवे ते देण्याचा प्रयत्न करा. कधी कधी पार्टनरला सॉफ्ट सेक्स आवडतो, तर कधी कधी काहीतरी वाईल्ड करण्याची इच्छा असते. अशावेळी त्यानुसार कृती करा.

> फोरप्ले करणे हा खूप उपयुक्त उपाय आहे. फोरप्लेमध्ये तुम्ही काय नावीन्य आणू शकता याचा विचार करा. मुलींना समागमाने मिळणारा परमोच्च आनंद हा तुम्ही समागम न करता देत असाल किंवा कमी वेळ समागम करून देत असाल तरी चालेल. पण त्यासाठी वेगवेगळे फोरप्ले करणे आवश्यक आहे. फोरप्ले कोणते करावे हे तुमच्या आणि तुमच्या पार्टनरच्या आवडीवर आहे.

> मानसिक तणाव, अपुरी झोप, नीद्रानाश, हार्मोन्सचा ताळमेळ बिघडणे, मधुमेह, उच्च रक्तदाब इत्यादी कारणांमुळे सेक्सची वेळ कमी होऊ शकते. तसेच मनावर दडपण असेल तेव्हाही तुम्ही तुमचे 100 टक्के देऊ शकत नाही. अशावेळी मानसिक आणि शरीरिकदृष्ट्या निरोगी रहाण्याचे प्रयत्न करा, कृतीला सुरुवात करण्याआधी रिलॅक्स राहा.

> लिंगाचा ताठरपणा जास्त वेळ राहावा म्हणून, मसाज, कीगल व्यायाम, स्क्वीझ टेक्निक अशा काही गोष्टींचा उपयोग करू शकता.

> भुजंगासन, पश्चिमोत्तासन  यासारखी आसने सेक्सलाईफ सुधारण्यासाठी फायदेशीर ठरतात. यामुळे तुमच्या जननेंद्रियांना होणारा रक्तपुरवठा सुधारतो.

> उत्तम सेक्ससाठी मद्यपान, धुम्रपान, प्रोसेस्ड  साखर यांसारख्या गोष्टी टाळा. यामुळे तुमच्या स्टॅमिनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. (हेही वाचा: Unprotected Sex: नकळत घडलेल्या सेक्सची काळजी नको; गर्भधारणा टाळण्यासाठी वरदान ठरू शकतात या वनौषधी)

> याशिवाय शेवगाच्या शेंगा खाणे, रोज पाच सहा केळी खाणे, डाळिंब खाणे, तिखट जास्त खाणे, लसूणाचा चार पाकळ्या नुसत्या चाउन खाणे, झिंक युक्त जीवनसत्वच्या गोळ्या रोज घेणे, वृशण मसाज करणे, केगल एक्जरसाइज हे काही घरगुती उपाय आहेत.

(सूचना : वरील मजकूर केवळ प्राप्त माहितीवर आधारित आहे. यास वैद्यकीय सल्ला समजू नये. घरगुती/नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला घेणे आवश्यक आहे. लेटेस्टली मराठी त्या मजकूराची पुष्टी करत नाही)