Unprotected Sex: नकळत घडलेल्या सेक्सची काळजी नको; गर्भधारणा टाळण्यासाठी वरदान ठरू शकतात या वनौषधी 
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credit : Pixabay)

स्त्री आणि पुरुष दोघांनाही मुलांना कधी जन्म द्यावा, या गोष्टीवर आपले नियंत्रण असावे अशी इच्छा असते. मात्र स्वतः जन्म नियंत्रण पद्धतींची आणि वेळेची निवड करणे सोपे नाही. कधी कधी असुरक्षित संभोगामुळे (Unprotected Sex) ही गोष्ट अजून अवघड ठरते. गर्भधारणा रोखण्यासाठी गर्भनिरोधक व प्रजनन नियंत्रण अशा काही पद्धती आहेत. काही नेहमीचे पर्याय म्हणजे संयम, कुटुंब नियोजन, महिला किंवा पुरुष कंडोम, तोंडी गर्भनिरोधक गोळ्या घेणे, इम्प्लान्टेबल डिव्हाइस अशा गोष्टी वापरल्या जातात. ज्या जोडप्यांना कधीच मुले नको असतात ती जोडपी कायमची नसबंदी करून घेतात. जन्म नियंत्रणाची कोणतीही उत्तम पद्धत किंवा उपाय नाही. प्रत्येकाचे काही फायदे आणि तोटे आहेत, किंबहुना यासाठी अगदी प्रभावी वाटणारी पद्धतही कधी कधी अपयशी ठरू शकते.

काही वनौषधींचा वापरही गर्भधारणा टाळण्यासाठी केला जाऊ शकतो. काही औषधी वनस्पतींमध्ये गर्भाशयाच्या भिंतीवर बीजांडाचे रोपण करण्यात अडथळा आणण्याची क्षमता असते. जर गर्भाशयाच्या भिंतीवर हा फलित गर्भ रुजला नाही, तर हे बीजांड तिथेच विरघळून जाते आणि त्यानंतर नेहमीप्रमाणे मासिकपाळी सुरु होते. अशाप्रकारे ही प्रजनन प्रक्रिया रोखण्यासाठी काही वनौषधींचा उपोग केला जातो.

वन्य गाजर (Queen Anne’s Lace) - गर्भधारणा टाळण्यासाठी एक महत्वाची औषधी वनस्पती म्हणजे वन्य गाजर. मुख्यतः या औषधी वनस्पतीच्या फुलांवर असलेले बियाणे गर्भनिरोधक म्हणून काम करतात. तातडीने घेण्यासाठी हे औषध उत्तम गर्भनिरोधक म्हणून प्रभावी आहे. अनेक अभ्यासांमधूनही हे सिद्ध झाले आहे. या बियाणातील अर्क परिपक्व झालेल्या बीजाची रोपण प्रक्रिया थांबवतो, त्यामुळे गर्भधारणा होऊ शकत नाही. मात्र काही लोकांना याच्या सेवनाने बद्धकोष्ठततेचा त्रास जाणवू शकतो. शिवाय, मूत्रपिंड किंवा पित्ताशयातील खड्यांचा त्रास असलेल्या लोकांसाठी हे औषध योग्य ठरणार नाही.

शुक्राणूच्या संपर्कात येण्याच्या आठ तासाच्या आत एक चमचा वन्य गाजराचे बियाणे घेणे आवश्यक आहे. त्यानंतर आणखी सात दिवस दररोज एकदा याचे सेवन करावे. याच्या उत्तम प्रभावासाठी बियाणे चघळून खा.

टीप - स्तनपान करत असलेल्या महिलांनी याचे सेवन करू नये.

निळा कोहोष (Blue Cohosh) - गर्भधारणा रोखण्यासाठी निळा कोहोष वनस्पतीची मूळे एक प्रभावी औषध आहे. निळ्या कोहोषमध्ये गर्भाशयाला आकुंचन प्राप्त करून देणारे दोन घटक असतात. हार्मोन ऑक्सीटोसिन सारखा एक घटक तर, कॅलोसाॅपोनिन नावाचा सॅपोनिन असतो. गर्भधारणा टाळण्यासाठी आपण कोणताही संरक्षणात्मक उपाय वापरला नसल्यास, 'ती' क्रिया पार पडल्यावर ताबडतोब निळ्या कोहोषापासून बनवलेल्या चहाचे सेवन करा.

  1. एक चतुर्थांश उकळत्या पाण्यात एक चमचा निळा कोहोष घाला
  2. पाच मिनिटासाठी हे मिश्रण उकळा
  3. आपली मासिक पाळी सुरू होईपर्यंत हा चहा दररोज तीन वेळा (दररोज 300 ते 400 मिलीग्रामपेक्षा जास्त नाही) घ्या.

टीपः या वनस्पतीचे काही दुष्परिणाम आहेत, म्हणून तज्ञाच्या मार्गदर्शनाखालीच या औषधी वनस्पतीचे सेवन करा.

पेनीरोयल (Pennyroyal) - पेनीरोयल ही एक पुदीन्यासारखी वनस्पती आहे. अगदी प्राचीन ग्रीक आणि रोमन लोकांपासून गर्भधारणा टाळण्यासाठी या वनस्पतीचा वापर केला जात आहे. पेनीरोयल गर्भधारणा थांबविण्यासाठी इतर औषधी वनस्पतींसह एकत्रितपणे घेतली जाऊ शकते. या औषधी वनस्पतीची ताजी आणि वाळलेली अशी दोन्ही प्रकारची पाने गर्भधारणा रोखण्यासाठी वापरली जाऊ शकतात. पेनीरोयल चहा हा मासिक पाळी चालू राहावी आणि गर्भपात व्हावा यासाठी उत्तम उपाय ठरतो.

  1. साधारण 1 कप पाणी उकळवा
  2. पाणी थोडे थंड झाल्यावर त्यात एक चमचा वाळलेले पेनीरोयल घाला
  3. त्यानंतर परत हे पाणी साधारण 10 ते 15 मिनिटे उकळवा
  4. हवे असल्यास त्यात थोडे मध घालू शकता
  5. असुरक्षित संभोग झाल्यावर ताबडतोब या चहाचे सेवन करा

टीप - लक्षात घ्या पेनीरोयलचा वापर सावधगिरीने करणे आवश्यक आहे. या वनस्पतीमुळे यकृत आणि मूत्रपिंडाचे विकार, मज्जासंस्थेचे नुकसान आणि इतर समस्या उद्भवू शकतात. पेनीरोयल चहा सहा दिवसांमध्ये तीन कपपेक्षा जास्त पिऊ नका. जर आपल्या मासिक पाळीसाठी 10 दिवसांपेक्षा जास्त उशीर झाला असेल तर हा चहा पिऊ नका. (हेही वाचा: The Supergirl Sex Position: लिंगाचा आकार लहान असला तरी पार्टनरला द्या परमोच्च सुख; ट्राय करा 'द सुपरगर्ल सेक्स पोझिशन)

कडुलिंब (Neem) - गर्भधारणा रोखण्यासाठी स्त्री आणि पुरुष अशा दोहोंसाठी कडूलिंब ही एक प्रभावी वनौषधी आहे. यासाठी तुम्ही कडुलिंबाची पाने, कडुलिंबाच्या पानांचा अर्क किंवा कडुलिंबाच्या तेलाचा वापर करू शकता. स्त्रियांसाठी, गर्भाशयात जिथे गर्भाशय आणि बीजवाहिन्या एकत्र येतात त्या ठिकाणी कडुलिंबाच्या तेलाचे एक इंजेक्शन प्रजननक्षमता थांबवू शकते. यामुळे गर्भाशयाचे कार्य किंवा मासिक पाळी यांमध्ये कोणतेही बदल घडत नाहीत. कडुलिंबाचे तेल शुक्राणूंची गती कमी करू शकते, ज्यामुळे पुरुष बीज स्त्री बीजापर्यंत पोहचू शकत नाही. कडुनिंबाचे तेल योनिमार्गात अवघ्या तीस सेकंदांमध्ये शुक्राणूंचा नाश करू शकते त्यामुळे त्याचे बीजांडाशी मिलन होऊ शकत नाही.

यासाठी पुरुषांनी एक महिना कडुलिंबाच्या पानाच्या गोळ्या किंवा जिलेटिन-कॅप्सूल स्वरूपात कडूलिंबाच्या बियांपासून तयार केलेल्या तेलाचा दैनंदिन वापर करणे आवश्यक आहे. कडूलिंबाच्या वापराने शुक्राणूंच्या उत्पादनावर कोणताही परिणाम होत नाही. गर्भधारणा रोखण्याबरोबरच, योनीतून आणि लैंगिक संक्रमणापासून होणारे रोग टाळण्यासाठीही कडूलिंबाचा वापर फायद्याचा ठरतो.

जर का तुम्ही या वनौषधींचा वापर करणार असाल, तर लक्षात घ्या योग्य वनस्पती योग्य प्रमाणात घेणे गरजेचे आहे. या औषधी वनस्पतींसह, गर्भधारणा रोखण्यासाठी स्त्री किंवा पुरुषाने कंडोमसारख्या गोष्टींचा वापर करणे गरजेचे आहे.

(सूचना : वरील मजकूर केवळ प्राप्त माहितीवर आधारित आहे. यास वैद्यकीय सल्ला समजू नये. घरगुती/नैसर्गिक उपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांच्या सल्ला घेणे आवश्यक आहे. लेटेस्टली मराठी त्या मजकूराची पुष्टी करत नाही)