कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी जाहीर केलेल्या लॉक डाऊनचा (Lock Down) उद्या शेवटचा दिवस आहे, सध्याची परिस्थिती पाहता हे लॉक डाऊन उद्या वाढू सुद्धा शकते, मात्र अजूनही अनेकजण कोरोनाचे संकट गांंभीर्याने घेत नाहीयेत. पोलिसांनी वारंवार सूचना करूनही काही महाभाग सरास घराबाहेर पडताना दिसत आहेत. अशावेळी त्यांना त्यांच्याच भाषेत ऐकवण्याची काम एका पोलीस अधिकाऱ्याने केले आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओ मध्ये कोरोना लॉक डाऊन काळात शहरात गस्त घालत असताना या पोलिसांनी अगदी हटके अंदाजात लोकांना घरात राहण्याचे आवाहन केले आहे आणि जर का तुम्ही घरी राहिला नाहीत तर 'तोड़ देंगे तुम्हारे शरीर का कोना कोना, मगर होने नहीं देंगे कोरोना' असेही म्हणताना हा पोलीस कर्मचारी दिसून येत आहे. Coronavirus In India: भारतामध्ये कोरोनाबाधितांचा आकडा 9152; मागील 24 तासांमध्ये 35 जण Covid 19 चे बळी
आम आदमी पक्षाचे नेते आणि राज्यसभेचे खासदार संजय सिंह यांनी सुद्धा हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये पोलीस कर्मचारी पेट्रोलिंग करताना तुम्ही घरात राहा नाहीतर दांड्याचा मार खा अशा आशयाची घोषणा देत आहेत. या व्हिडीओ पोस्ट करताना संजय सिंह यांनी, या पोलिस कर्मचाऱ्याच्या बोलण्याचा तुमच्यावर परिणाम झाला नाही. तर, तुम्हाला वाचवणे अवघड आहे. या भावाचे ऐका, असे भावनिक आवाहन केले आहे. पंजाब मधील पोलीस अधिकारी हरजित सिंह यांचा कापलेला हात पुन्हा जोडला; मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी मानले डॉक्टरांचे आभार
पहा व्हायरल व्हिडीओ
इस पुलिस वाले की बात का भी अगर आप पर असर न हुआ तो आपका बचना मुश्किल, सुनिए “भाई की भावुक अपील” pic.twitter.com/uLNkXB1djW
— Sanjay Singh AAP (@SanjayAzadSln) April 13, 2020
दरम्यान, लॉक डाऊन कालावधीत नागरिकांना घरात रोखून ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन रात्रंदिवस राबत आहे. कधी कविता म्ह्णून, कधी गाणी गात तर कधी चक्क यमराज आणि चित्रगुप्तच्या अवतारात गल्लोगल्ली फिरून त्यांनी यापूर्वी नागरिकांना सूचना दिल्या आहेत. प्रसंगी दांड्याने मारून सुद्धा नागरिक ऐकत नाहीयेत. शेवटी मग आता या पोलीस कर्मचाऱ्याने दिलेली वॉर्निंग तरी आता लोकांच्या वागण्यात बदल आणते का हे पाहायचे आहे.
दुसरीकडे कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता आता लॉक डाऊनचा कालावधी वाढवला जाईल असे स्पष्ट आहे याबाबत अधिकृत शिक्कारताब उद्या होऊ शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या सकाळी 10 वाजता नागरिकांशी संवाद साधणार आहेत.