भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यंदा 17 सप्टेंबरला आपला 72 वा वाढदिवस साजरा करत आहेत. 2014 पासून भारताच्या पंतप्रधान पदी विराजमान असलेल्या नरेंद्र मोदी यांचे देशा-परदेशात चाहते आहेत. परदेश दौर्यातही आबालवृद्ध भारतीय तासनतास रांगेत उभे राहून त्यांची एक भेट मिळावी म्हणून वाट पाहत असतात. नरेंद्र मोदी यांचा जन्म गुजरातच्या वडनागर येथे 17 सप्टेंबर 1950 साली झाला. नरेंद्र मोदी वाढदिवसा दिवशी देखील काम करण्याला प्राधान्य देतात. यंदा पंतप्रधान मध्य प्रदेश मध्ये कुनो नॅशनल पार्क मध्ये आफ्रिकेतून येणार्या 8 चित्त्यांना सोडणार आहेत.
भारतासह जगभरात विखुरलेले अनेक तरूण भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपला आदर्श मानतात. त्यांचा कामाचा झंझावात, योग साधना करून आरोग्य निरोगी ठेवण्याचा अट्टाहास, मातृभूमीवर असलेले प्रेम या छोट्या छोट्या गोष्टी अनेकांना प्रेरणा देत आहेत. मग आज त्यांच्या जन्मदिनी नरेंद्र मोदींना शुभेच्छा देण्यासाठी काही Greetings, HD Images, Wallpapers, WhatsApp Status शेअर करत हा दिवस थोडा खास करू शकता.नक्की वाचा: PM Modi Birthday: पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त खास 56 इंचाची थाळी, थाळी संपवणाऱ्यास आठ लाखांच्या बक्षीसासह केदारनाथची यात्रा.
नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला 'डिजिटल इंडिया', 'वोकल फॉर लोकल', 'मेक इन इंडिया' असे बहुआयामी प्रकल्प दिले. या प्रकल्पाच्या माध्यमातून भारतामध्येच रोजगाराच्या संधी निर्माण करण्याच्या आणि आयात कमी करण्याचा प्रयत्न झाला. भारताच्या अशा या 'विकासा'चं लक्ष्य घेऊन पुढे जाणार्या पंतप्रधानांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा!