कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे सामूहिक विवाहसोहळ्यात फिलिपिन्स कपल्सने मास्क घालून केले Kiss (Watch Video)
Couples marry wearing surgical masks in Philippines (Photo Credits: IANS Photo)

कोरोना व्हायरस ने चीन, जपानसह इतर आशियाई देशांमध्येही दहशत पसरवली आहे. सीओव्हीआयडी-19 म्हणून ओळखल्या जाणार्‍या कोरोना व्हायरसने चीनमध्ये 2,236 लोकांचा बळी घेतला आहे. त्यामुळेच कोरोना व्हायरसची दहशत इतकी प्रचंड आहे की, फिलिपिन्स मध्ये पार पडलेल्या सामूहिक विवाहसोहळ्यात जोडप्यांनी चक्क मास्क घालून किस केलं आहे. शासन पुरस्कृत सामूहिक विवाहसोहळा फिलिपिन्समधील बाकोलॉड शहरात आयोजित करण्यात आला होता. या विवाहसोहळ्यात वर-वधू मास्क घालून वचनबद्ध झाले. विवाहसोहळ्याला वर-वधूचे कुटुंबिय आणि नातेवाईक देखील उपस्थित होते. एकूण 220 जोडपी या सोहळ्यात वचनबद्ध झाली. (Video: कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी एका तरूणाने लढवली अनोखी शक्कल; व्हिडिओ पाहून बसेल धक्का!)

व्हेलेंटाईन डे नंतर अशा प्रकारचा सोहळा आयोजित करण्याची फिलिपिन्स देशाची परंपरा आहे. नेग्रोस बेटाच्या बाकोलॉड शहरात हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. गेल्या काही दिवसांपासून कोरोना व्हायरसने घातलेल्या धुमाकूळानंतर नवविवाहीत दाम्पत्यांना वैद्यकीय तपासणी करण्यास सांगितले होते.

ट्विट:

फिलिपिन्सची परंपरा असलेल्या या सामूहिक विवाहसोहळ्यात 2013 साली चक्क 2013 जोडपी विवाहबद्ध झाली होती. सामूहिक विवाहसोहळा हा साऊथइस्ट आशियाई देशांमध्ये आणि साऊथ कोरिया मध्ये सामान्यपणे पार पडतात. यंदा सुमारे 30000 लोकांनी अशा प्रकारच्या विवाहसोहळ्यांना उपस्थिती लावली असेल. यावेळी उपस्थितांना हॅड सॅनिटायझर आणि मास्क पुरवले जात होते.

व्हिडिओ:

विशेष म्हणजे फिलिपिन्स सरकारने नागरिकांना चीन, हाँगकाँग आणि मकाऊ येथे जाण्यास बंदी घातली आहे. जपानमधील डायमंड प्रिन्सेस क्रूझ जहाजाच्या 7,7०० प्रवाशांपैकी किमान 636 प्रवाशांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील 44 सदस्य फिलिपिन्स आहेत.