P.K. Rosy's 120th Birth Anniversary Google Doodle: पी के रोझी च्या जन्मदिनानिमित्त गूगल ने मल्याळम सिनेमातील पहिल्या अभिनेत्रीला दिली मानवंदना
PK Rosy | Google Home Page

मल्याळम सिनेमांतील पहिली अभिनेत्री पी.के. रोझी (P K Rosy) यांच्या 120 व्या जन्मदिनानिमित्त आज गूगलने खास डूडलच्या माध्यमातून मानवंदना दिली आहे. पी के रोझी या केवळ पहिल्या महिला अभिनेत्री नव्हत्या तर त्या दलित समाजातून आलेल्याही पहिल्या कलाकार होत्या. केरळच्या तिरूअनंतपूरम (Thiruvananthapuram) मध्ये 1903 साली त्यांचा जन्म झालेल्या रोझी यांना लहानपणापासून अभिनयाची आवड होती. ‘Vigathakumaran’ या सिनेमात त्यांनी पहिल्यांदा प्रमुख भूमिका साकारली होती. रोझी सिनेमामध्ये उच्च वर्णीय जातीतील महिलेचे पात्र साकारत होत्या. एका सीन मध्ये प्रमुख पुरूष पात्र तिच्या केसातील गुलाबाला किस करतो त्यावरून मोठा गदारोळ उठला होता. त्यानंतर रोझी यांना केरळ राज्य सोडून जावं लागलं होतं. लॉरीमधून लपून त्यांनी तामिळनाडू गाठलं. तेथे तिने लॉरी ड्रायव्हर सोबत लग्न केलं आणि ‘Rajamma’म्हणून स्थायिक झाली.

पहा ट्वीट

रोझी यांनी अनेक रीती रिवाज तोडून तेव्हाच्या महिलांना काम करण्याची संधी मिळावी म्हणून पावलं उचलली. परफॉर्मिंग आर्टमध्ये काम करण्यासाठी महिलांना संधी मिळवून दिली. लहानपणीच वडीलांचं निधन झालेल्या रोझीला सुरूवातीला पोटापाण्यासाठी संघर्ष करावा लागला. नंतर तिच्या काकांनी तिच्यामधील कलागुण हेरून तिला शास्त्रीय नृत्य, गाण्याचे शिक्षण मिळवून देण्यास मदत केली. नक्की वाचा: Balamani Amma Google Doodle: बालमणि अम्मा, प्रसिद्ध मल्याळम कवयित्रीला गूगल कडून खास मानवंदना.

रोझी यांना त्या सिनेक्षेत्रामध्ये काम करत असताना फारशी कामासाठीची पोचपावती मिळाली नाही पण तिचा सारा प्रवास आजही अनेकांसाठी प्रेरणा आहे.