Balamani Amma Google Doodle

गूगल कडून आज होमपेजवर बालमणी अम्मा (Balamani Amma)या मल्याळम कवयित्रीला खास डूडलच्या माध्यमातून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. बालमणी अम्मा यांची ओळख कायमच मल्याळम कवितांची 'अम्मा' आणि आजी अशी राहिली आहे. त्यांना 1987 साली भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार 'पद्म विभूषण' पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यापूर्वी Muthassi साठी 1965 ला साहित्य अकादमी अवॉर्ड देण्यात आला होता. 1995 साली Nivedyam साठी 'सरस्वती सन्माना'ने देखील त्यांना गौरवण्यात आले आहे.

गूगलवर झळकणारं आजचं डूडल देखील केरळच्या Devika Ramachandran यांनी साकारलं आहे. आज बालमणी अम्मा यांची 113 वी जयंती आहे. Thrissur मधील Punnayurkulam च्या Nalapat मध्ये 1909 साली आजच्या दिवशी बालमणी अम्मा यांचा जन्म झाला होता.

 बालमणी अम्मा गूगल डूडल 

 

बालमणी अम्मा यांनी शाळेत जाऊन अधिकृत शिक्षण घेतलेले नाही पण त्यांच्या काकांनी त्यांना घरीच अक्षर ओळख करून दिली होती. बालमणी यांचे काका Nalappat Narayana Menon हे देखील प्रसिद्ध मल्याळी कवी होते. वयाच्या 19 व्या वर्षी बालमणी यांचे लग्न Mathrubhumi या मल्याळी वृत्तापत्राचे मॅनेजिंग डिरेक्टर, एडिटर V.M. Nair यांच्यासोबत झाले. हे देखील नक्की  वाचा: Oskar Sala Google Doodle Today: जर्मन इलेक्ट्रॉनिक संगीत प्रवर्तक ऑस्कर साला 112 वी जयंती निमित्त खास गूगल डूडल, तुम्ही पाहलेत का? 

2004 साली बालमणी अम्मा यांचे निधन झाले. त्यांच्या कविता या लहान मुलांप्रती, नातवंडांप्रती प्रेम व्यक्त करणार्‍या असल्याने त्यांची तिच ओळख कायम राहिली आहे.