जगभरामध्ये 22 एप्रिल हा दिवस वसुंधरा दिवस अर्थात Earth Day म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने आज आघाडीचं सर्च इंजिन गूगल (Google) कडून देखील खास अंदाजात या दिवसाकडे लक्ष वेधण्यासाठी गूगल डूडल साकारण्यात आलं आहे. आज होम पेजवर गूगलने टाईम लॅप्सचा वापर करत वसुंधरा दिनाचं खास डूडल साकारलं आहे. आपल्या पृथ्वीवर हवामानातील बदल (Climate Change) कसा परिणाम करत आहे याचं चित्रण करण्यात आलं आहे.
गूगल अर्थ द्वारा काही फोटोंच्या मदतीने आज गूगल डूडलवर टाईम लॅप्स करण्यात आले आहेत. काही दशकांमध्ये हवामानातील बदलांमुळे पृथ्वीवरील प्रवाळ खडक, हिमनदी आणि सामान्य हिरवळ कशी कमी होत जात आहे याची दाहकता यामधून मांडली आहे. हे देखील नक्की वाचा: जागतिक वसुंधरा दिनाच्या शुभेच्छा WhatsApp Status, Facebook Messages, GIFs द्वारा देत व्यक्त करा कृतज्ञता!
आजच्या वसुंधरा दिनाच्या निमित्ताने गूगलवर झळकत असलेल्या डूडलवर क्लिक केल्यास तुमच्या समोर टाईम लॅप्स द्वारा पर्यावरणातील अनेक गोष्टींबाबतची माहिती येणार आहे.
UN ActNow ने पृथ्वी दिन 2022 च्या निमित्ताने हवामान बदलाविरूद्ध अनेक पर्यायांची माहिती दिली आहे, ज्याद्वारे लोक सकारात्मक बदल करू शकतात. लोकांना घरात जास्तीत जास्त ऊर्जा वाचवण्यासाठी, सार्वजनिक वाहतूक वापरण्यासाठी आणि अधिक भाज्या आणि कमी मांस खाण्यासाठी प्रोत्साहित केले गेले आहे.