
उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) देवरिया जिल्ह्यामधील एक वयोवृद्ध व्यक्ती वरातीमध्ये नाचता नाचता अचानक कोसळल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडीयामध्ये वायरल होत आहे. कोसळताच त्याचा मृत्यू झाला आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार देवरिया जिल्ह्यामधील थाणा भटनी गावाच्या चंदौली भागात 11 जून दिवशी मान सिंहच्या मुलाची वरात निघाली होती. त्यामध्ये हा प्रकार घडला.
एकीकडे द्वारपूजेची तयारी आणि विधी सुरू होते तर काही तरूण मंडळी दुसरीकडे नाचत होती. त्यावेळी राम निवास गिरी पिकप गाडी वर चढून नाचत होते. काही वेळाने ते गाडीच्या रॉडला पकडून लटकून स्टंट देखील करत होते. या स्टंटबाजीमध्ये त्यांच्या हात सुटला आणि ते धाडकन खाली पडले. हा प्रकार पाहून उपस्थितांमध्येही गोंधळ पसरला.
जखमी राम निवास यांना जवळच्या दवाखान्यात नेण्यात आले पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. नंतर घरातील व्यक्तींनी त्यांच्यावर अंतिम संस्कार केले. Funny Wedding Video: 'वावर हाय तर पावर हाय', एकदोन नव्हे 51 ट्रॅक्टर घेऊन नवरदेव पोहोचला मांडवात, सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओची चर्चा .
राम निवास अविवाहित होते. आपल्या लहान भावासोबत ते राहत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा मृत्यू नाचताना पडल्यामुळे झाला आहे.