ओडिशा: पेट्रोल पंपावरील स्टिलच्या पाईप मध्ये अडकला किंग कोब्रा, फसलेल्या सापाची सुटका कशी केली पहा त्याचा Video
King Cobra Rescue (Photo Credits-ANI)

रहिवाशी परिसरात साप दिल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होतेच. पण त्याची तेथून सुटका करणे म्हणजे सर्पमित्राची मदत घेतल्याशिवाय काही होत नाही. या बद्दलचे अनेक व्हिडिओ आपण सोशल मीडियात व्हायरल झाल्याचे सुद्धा पाहिले आहे. अशातच आता ओडिशा येथील एका पेट्रोल पंपावरील स्टिलच्या पाईप मध्ये किंग कोब्रा फसल्याचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. या कोब्राला पाईप मधून बाहेर काढण्यासाठी अथक प्रयत्न केल्यानंतरच त्याची सुटका करण्यात आली आहे. त्याला बाहेर काढल्यानंतर जंगलात सोडण्यात आले आहे.(Man Surrounded By Snakes: अनेक धोकादायक सापांनी वेढलेल्या जागेत कॅमेऱ्यामध्ये बोलत राहिली व्यक्ती, अचानक... See Viral Video)  

ANI यांनी दिलेल्या रिपोर्टनुसार, ओडिशा मधील मयूरभंज येथील एका पेट्रोल पंपावरील स्टिलच्या पाईपमध्ये अचानक एक किंग कोब्रा साप अडकला गेला होता. पाईपमध्ये अडकल्यानंतर सापाने स्वत:ला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुद्धा केला पण त्याला ते जमले नाही. त्यानंतर स्थानिकांनी सर्पमित्रांना याबद्दल माहिती दिली. सर्पमित्रांनी घटनास्थळी पोहचून त्याची सुटका केली.(Snake Fight Viral Video: नागिन सापाला भुरळ घालण्यासाठी दोन विषारी साप आपसात भिडले; पहा जबरदस्त लढाईचा व्हायरल व्हिडिओ)

Photo:

Video:

दरम्यान, सापाला बाहेर कसे काढले गेले याचे फोटो सुद्धा समोर आले आहेत. त्यात असे दिसून येते की, कोब्रा पाईप मध्ये अडकला आहे. आपल्या फणाने तो बाहेर येण्याचा प्रयत्न करतोय पण त्याला ते जमत नाहीय. अखेर सर्पमित्रांच्या मदतीचे त्याला वाचवण्यात आले आहे.