Noodles Knitting: नूडल्स विणकाम, कला तर पाहा, व्हाल अवाक (Video)
Noodles Knitting | (Photo Credit: Credit - Twitter)

विणकाम (Knitting), अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय. काहींचा छंद म्हणून काहींचा गरज म्हणून. अनेक लोक विनकाम करता. आपणही पाहिले असेल. पण आपण लोकरीपासून किंवा सुती धाग्यांपासून केलेले विणकाम पाहिले असेल. पण इथे आम्ही बोलत आहोत नूडल्स (Noodles Knitting) विणकामबद्दल. कदाचित आपल्याला आश्चर्य वाटले असेल. पण खरोकरच काही महाभाग कलंदर कलाकार असतात. जे काहीही अचाट करु शकतात. इथे दिलेल्या व्हिडिओतही असेच दिसते. काही लोक चक्क नूडल्स विणत (Noodles Knitting Woman's Video) आहेत. होय, अर्थातत विणलेल्या नुडल्सचे (Noodles) ते पुढे काय करतात याबातब माहिती नाही. पण, त्यांची कलाकारी मात्र नक्कीच दाद देण्यासारखे. हे व्हिडिओ सोशल मीडियावरही Social Media) व्हायरल (Viral Video) होतात.

व्हायरल होत असलेल्या या व्हडिओत आपण पाहू शकता की, एक महिला चॉपस्टिकच्या मदतीने चक्क नूडल्सच विणत आहे. व्हिडिओ पाहताना कोणालाही वाटू शकते की, ही महिला स्वेटरच विणत आहे. पण तसे नव्हे. ही महिला चक्क नूडल्स विणते आहे. आपण पाहू शकता की, एका भांड्यात शिजवलेले नूडल्स ठेवले आहेत. जे खायचे सोडून ही महिला ते विणत बसली आहे. बाकी काही असले तरी या महिलेच्या हातात मात्र मोठी जादू आहे बरं. आपणही पाहू शकता हा व्हिडिओ. (हेही वाचा, Live TV Debate सुरु दरम्यान महिला पॅनलीस्ट करु लागली Dance, अँकरला फुटला घाम; प्रेक्षकांचे मनोरंजन, पाहा व्हिडिओ)

व्हिडिओ

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ @mixiaoz नावाच्या ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आला आहे. जो आतापर्यंत 60 लाखांहून अधिक युजर्सनी पाहिला आहे. लोकांना हा व्हिडिओ पाहून इतके आश्चर्य वाटले आहे की, लोक चक्क आश्चर्य व्यक्त करु लागले आहेत. एका युजरने म्हटले आहे की, चॉपस्टिकने नूडल्स पकडणे अवघड जाते. ही बाई तर चक्क स्वेटर विणते आहे. दुसऱ्या एकाने याला अद्भूत कला असेच म्हटले आहे. युट्युबवरही असे अनेक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात.