Strawberry and Blueberry Samosa: स्ट्रीट फूड (Street Food) च्या शौकिनांचे एक वेगळेच विश्व असते. अनेकदा सोशल मीडियावर विचित्र पदार्थ व्हायरल होतात. कधी लोकांना ते आवडतात तर कधी लोकांना त्याचा रागही येतो. सध्या बाजारात एक नवीन डिश आली आहे, जी दिल्लीतील एका स्ट्रीट फूड विक्रेत्याने आणली आहे. ज्यांनी ही डीश खाल्ली आहे, तेच या रेसिपीची चव सांगू शकतील. परंतु, या डिशचा रंग खूपच रंगीबेरंगी आहे. हा एक समोसा आहे, जो स्ट्रॉबेरी आणि ब्लूबेरी फ्लेवर्समध्ये (Strawberry and Blueberry Samosa) बनवला जातो.
वास्तविक, स्ट्रॉबेरी आणि ब्लूबेरी फ्लेवर्सचा समोसाचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. बर्निंग स्पाइसेस नावाच्या एका फूड ब्लॉगरने आपल्या इंस्टाग्राम पेजवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये गुलाबी आणि निळ्या रंगाचे समोसे दिसत आहेत. याला कॅप्शन देण्यात आले आहे की, तुम्ही समोसेचे अनेक प्रकार नक्कीच ट्राय केले असतील, पण हा समोसा वेगळा आहे. लोक म्हणतील काय खातोय, काय बघतोयस, काय खातोयस. पण हा स्ट्रॉबेरी समोसा आणि ब्लूबेरी समोसा डेझर्ट म्हणून खाल्ला जातो. (हेही वाचा - Snake Viral Video: पाठीवर दप्तर अडकवून चिमुरडी पोहोचली शाळेत; वर्गात गेल्यावर बॅग उघडताचं निघाला विषारी नाग, पहा व्हिडिओ)
समोसा हब नावाच्या या दुकानात हे दोन्ही प्रकारचे समोसे दिले जातात. दिल्लीतील हे फूड आउटलेट हे स्ट्रॉबेरी आणि ब्लूबेरी समोसे देत आहे. गुलाबी रंगाच्या समोसाला स्ट्रॉबेरी समोसा म्हटले जात आहे. ज्यामध्ये जाम आणि स्ट्रॉबेरी फिलिंग आहे. यासोबत ब्लूबेरी समोसे म्हणून ओळखल्या जाणार्या निळ्या रंगाच्या समोशामध्ये ब्लूबेरी जॅम आहे.
View this post on Instagram
या दोन्ही समोशांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मात्र, त्यावर नेटीझन नाराज आहेत. लोक याला एक विचित्र संयोजन म्हणत आहेत. आता तर मर्यादाच संपली, अशी प्रतिक्रियाही एका सोशल मीडिया यूजर्सने दिली आहे. मात्र, आता ही नवीन डिश लोकांच्या चवीला कितपत तृप्त करू शकते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.