शिर्डी मधील द्वारकामाई मंदिरातील एका भिंतीवर दिसले साईबाबा, भाविकांनी केली मोठ्या प्रमाणात गर्दी (Video)
शिर्डा साई बाबा (फोटो सौजन्य-YouTube)

साईभक्तांसाठी साई बाबा (Sai Baba) हे त्यांच्यासाठी सर्वस्व आहेत. त्याचसोबत साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी राज्यातील विविध ठिकाणाहून भाविक शिर्डीत (Shirdi) दाखल होतात. तर काही भाविक साईबाबांना फकीर, योगी किंवा साधू-संत म्हणून संबोधतात. तसेच साईबाबांचा महिमा अघाध असल्यामुळे त्यांच्या दर्शनासाठी साईबाबांच्या मंदिरांत भक्तांची मोठ्या प्रमाणात दिसून येते. साईबाबांच्या पुढे नतमस्तक केल्यानंतर आपण जी इच्छा व्यक्त करतो ती पूर्ण होते असे काही भाविकांचे म्हणणे आहे. मात्र आता पुन्हा एकदा शिर्डीतील साईबाबांच्या मंदिरातील ठिकाणी एक चमत्कार पाहायला मिळाला आहे.

शिर्डीतील साईबाबा मंदिराचा पुन्हा एकदा बोलबाला झाला आहे. तर एक चमत्कारिक गोष्ट तेथे घडल्याचे बोलले जात आहे. काही भाविकांचा असा दावा आहे की, साई बाबा यांचा फोटो मंदिराच्या एका भिंतीवर दिसल्याचे म्हटले जात आहे. याची चर्चा आता सर्वत्र सुरु झाली असून लोक चमत्करझाल्याचे म्हणत आहेत. 11 जुलै रोजी रात्री 11.30 वाजताच्या सुमारास द्वारकामाई मंदिरातील एका भिंतीवर साईबाबा दिसल्याचा दावा काही लोकांनी केला आहे.

(शिवनेरी गडावर पहिल्यांदा सापडलेल्या Frerea या दुर्मिळ वनस्पतीचं नामकरण लवकरच 'शिव सुमन')

साईबाबा भिंतीवर दिसल्याचा दावा यापूर्वी सुद्धा भाविकांनी केला होता. तर शिर्डीच्या साईबाबांना एक चमत्कारी पुरुष आणि देवाचे रुप असल्याचे मानले जाते. परंतु आजसुद्धा साई बाबा यांच्याबद्दलचे काही प्रश्न रहस्यमय आहेत. पण तरीही साई बाबांच्या भक्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येते.