छत्रपती शिवाजी महाराज यांचं जन्मस्थान असलेल्या शिवनेरीवरील 'फ्रेरिया' (Frerea)या दुर्मिळ वनस्पतीचं नामकरण आता लवकरच 'शिवसुमन' (Shiv Suman) असं करण्यात येणार आहे. ब्रिटीश वनस्पतीशास्त्रज्ञ Nicol Alexander Dalzel यांनी 1865 साली पहिल्यांदा हे फूल जगासमोर आणलं होतं.लातूर येथे तयार झाले देशातील पहिले Grass Painting; 7 दिवस गवत उगवून साकारले शिवाजी महाराज (Video)
TOI ने दिलेल्या वृत्तानुसार, पुणे महानगरपालिका, स्वयंसेवी संस्था, आणि भारतीय वनस्पती सर्वेक्षण पुणे केंद्र यांच्यासह पर्यावरणप्रेमींनी 'शिव सुमन' या नावाला संमती दिली आहे. रायगडावर स्वच्छता मोहिमेदरम्यान ही वनस्पती पुन्हा समोर आली आहे. तसेच त्याची पन्नासहून अधिक रोपं रायगडावर रूजवण्यात आली आहेत.
फ्रेरिया ही दुर्मिळ वनस्पती शिव सुमन अशी नामांतरित करताना छत्रपतींच्या नावामधून 'शिव' आणि फूलाचा समानार्थी 'सुमन' या शब्दाची निवड करण्यात आली आहे. ही वनस्पती नाशिक, सातारा, रायगड, पुणे, अहमदनगर या भागात आढळते. या वनस्पतीला 'Shindal Makudi' असंदेखील म्हणतात.