म्यानमार: नोज लॅन्डिंग गियर फेल झालेलं असतानाही वैमानिकाने सुरक्षितपणे केलं विमानचं लॅन्डिग; व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल (Watch Video)
Myanmar Plane makes emergency touchdown. (Photo Credits: Breaking Aviation News)

म्यानमारमध्ये (Myanmar) आज लॅन्डिंग गियर फेल (Nose Lansing Gear Failure) झाल्यानंतर पायलटने पुढच्या चाकाशिवायच विमानाचं जमिनीवर लॅन्डिंग केलं आहे. यामध्ये कोणतीही जीवहानी झाल्याची माहिती नाही. मात्र हा प्रकार सध्या सोशल मीडीयामध्ये एका व्हिडिओच्या माध्यमातून झपाट्याने व्हायरल आहे.  म्यानमार एअरलाईन्सच्या फ्लाईट UB-103 मध्ये हा प्रकार घडला.

 व्हायरल व्हिडिओ  

म्यानमारमध्ये अशाप्रकारे लॅन्डिंग करण्याचा आठवडाभरातील हा दुसरा प्रकार आहे. म्यानमार एअरलाईन्सच्या फ्लाईट UB-103 मध्ये हा प्रकार घडला. भारतीय वेळेनुसार रात्री 2.30 वाजता मेंडलेमध्ये विमानाचं लॅन्डिग करण्यात आलं. वैमानिकासह 89 लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आहे. सध्य सोशल मीडियात व्हायरल होत असलेल्या क्लिपनुसार विमानाच्या पुढच्या भागाला जमिनीवर टेकवत लॅन्डिंग करण्यात आलं.

विमान कंपनीने हा तांत्रिक बिघाड असल्याचं म्हटलं आहे. विमानाचं सुरक्षित लॅन्डिंग झालं असलं तरीही सध्या इंजिनियरिंग टीमकडे पाठवण्यात आलं आहे. इतर जेट विमानांचीदेखील तपासणी सुरूआहे.