Mumbai Winter Memes:  मुंबईकरांना कुडकुडायला लावणार्‍या थंडीचे सोशल मीडिया मध्ये मिम्स व्हायरल!
Mumbai Winter 2020 Viral Memes | Photo Credits: Twitter

Mumbai Winter 2020 Viral Memes: मुंबईमध्ये आज (17 जानेवारी) थंडीचा पारा चांगलाच घसरला आहे. सकाळी मुंबईत तापमान 11 अंश डिग्री सेल्सियसच्या आसपास असल्याने शाळा, कॉलेज आणि नोकरी धंद्यासाठी बाहेर पडलेले मुंबईकर कुडकडताना दिसले. अनेकांनी ठेवणीतील उबदार कपडे सध्या बाहेर काढले आहेत. त्यावरूनच आता सोशल मीडियावर मजेदार मिम्स व्हायरल होण्यासही सुरूवात झाली आहे. Maharashtra Weather Updates: मुंबई शहरामध्ये 2013 नंतर आज सर्वात कमी तापमानाची नोंद; जाणून घ्या पुणे, नाशिक सह अन्य शहरातील तापमान.

मुंबई हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज आज मुंबई शहरामध्ये 2013 सालानंतर सर्वात कमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान हवामान खात्याकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार कुलाबामध्ये आज (17 जानेवारी) दिवशी मुंबई शहराचे कुलाबा येथे नोंदवण्यात आलेलं किमान तापमान 14.5 अंश सेल्सियस आहे तर सांताक्रुझ येथे किमान तापमान 11.4 अंश सेल्सिअस आहे. तर आज सकाळी सांताक्रुझ मध्ये सकाळी 5.30 वाजता 13 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

मुंबईकरांना हुडहुडी भरवणार्‍या थंडीचे मिम्स

 

ट्वीट 1

ऊबदार कपड्यांची उडवली टर 

मुंबईतील थंडी

 

उबदार रजई आणि मुंबई थंडी 

 

पुढील काही दिवस मुंबई सह महाराष्ट्रात थंडी कायम राहणार आहे. या काळात आभाळ निरभ्र राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. निफाड आणि महाबळेश्वरमध्ये दवबिंदू गोठल्याचं चित्र आहे. मुंबईकरांनी आत्तापर्यंत सर्वात थंड दिवस 22 जानेवारी 1962 दिवशी अनुभवला आहे. त्यावेळेस मुंबईचं तापमान 7.4 इतके खाली गेले होते. मागील दशकातील सर्वात थंड जानेवारी महिना हा 2012 सालचा आहे. 29 जानेवारी 2012 साली मुंबईचा पारा 10 अंश डिग्री सेल्सियस इतका खाली गेला होता.