
Mumbai City Weather Update: महाराष्ट्रामध्ये यंदा मान्सून रेंगाळल्यानंतर थंडीचं आगमन देखील थोडं उशिरानेच झालं आहे. मागील दोन दिवसांपासून थंड वारा वाहत असल्याने मुंबईसह महाराष्ट्रातील सर्वसामान्य कुडकडत आहेत. आज मुंबई शहरामध्ये 2013 सालानंतर सर्वात कमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान हवामान खात्याकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार कुलाबामध्ये आज (17 जानेवारी) दिवशी मुंबई शहराचे कुलाबा येथे नोंदवण्यात आलेलं किमान तापमान 14.5 अंश सेल्सियस आहे तर सांताक्रुझ येथे किमान तापमान 11.4 अंश सेल्सिअस आहे. तर आज सकाळी सांताक्रुझ मध्ये सकाळी 5.30 वाजता 13 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. अशी माहिती मुंबई हवामान वेधशाळेकडून (IMD Mumbai) देण्यात आली आहे.
मुंबई प्रमाणेच महाराष्ट्रातही थंडीचा पारा घसरला आहे. निफाडमध्ये निच्चांकी तापमान 2 अंश सेल्सियस इतके खाली गेले आहे. तर महाबळेश्वरमध्ये आज दवबिंदू गोठले होते, प्रसिद्ध वेण्णा लेक परिसरातही दवबिंदू गोठले आहेत.
जाणून महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील तापमान काय?
पुणे- 12 अंश
महाबळेश्वर - 13 अंश
मुंबई - 15.2 अंश
नाशिक - 9 अंश
नागपूर - 15 अंश
सध्या महाराष्ट्रात पुढील काही दिवस थंडी कायम राहणार असल्याने मुंबईकरांनी थंडीच्या दिवसांत पुरेशी काळजी घ्यावी असे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे. मुंबईकरांनी आत्तापर्यंत सर्वात थंड दिवस 22 जानेवारी 1962 दिवशी अनुभवला आहे. त्यावेळेस मुंबईचं तापमान 7.4 इतके खाली गेले होते. मागील दशकातील सर्वात थंड जानेवारी महिना हा 2012 सालचा आहे. 29 जानेवारी 2012 साली मुंबईचा पारा 10 अंश डिग्री सेल्सियस इतका खाली गेला होता.