मुंबई: शॉपिंग मॉलच्या बाहेर उंदरांना पकडण्यासाठी ठेवले ग्लू पॅड, अडकला गेला विषारी साप
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-Facebook)

बाजारात उंदरांना पकडण्यासाठी विविध प्रकारची औषध मिळतात. परंतु जर एखादा उंदीर जरी घरात किंवा कुठेही दिसून आल्यास तो तेथील वस्तूंचे नुकसान केल्याशिवाय राहत नाही. यासाठी मुंबई (Mumbai) येथील एका शॉपिंग मॉलच्या बाहेर उंदरांना पकडण्यासाठी ग्लू पॅड (Glue Pad) ठेवण्यात आले होते. मात्र ग्लू पॅडवर उंदिर नाही तर चक्क विषारी साप जाळ्यात अडकल्याचा प्रकार समोर आला आहे.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, बुधवारी मुलुंड पश्चिम स्थित असलेल्या एका शॉपिंग मॉल बाहेर लावण्यात आलेल्या ग्लू पॅडवर विषारी साप अडकला गेल्याचे दिसून आले. प्रथम तेथील नागरिकांनी पाहिले असता त्यांना सापाची शेपटीच दिसली. मात्र काही वेळानंतर सर्पमित्रांच्या सहय्याने अडकलेल्या सापाला बाहेर काढण्यात आले.(माकडाचा 'देसी स्टाइल' मधील कपडे धुण्याचा अंजाद नेटकऱ्यांना भावला, व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल Watch Video)

ग्लू पॅड मध्ये अडकलेला साप सध्या सर्पमित्रांच्या निगराणीखाली आहे. रिपोर्टनुसार, सापाच्या शरीरातून ग्लू जो पर्यंत पूर्णपणे बाहेर येत नाही तो पर्यंत त्याची काळजी विनभागातर्फे केली जाणार आहे. असे सांगितले जात आहे की, मॉल बाहेरुन पकडलेला हा साप रसेल वायपर या जातीच्या श्रेणीमधील आहे.