Mumbai Police: 38 वर्षीय हवालदार Amol Kamble यांच्या डान्स मूव्ह्ज पाहून बसेल आश्चर्याचा धक्का; रातोरात सोशल मिडियावर व्हायरल (Watch Videos)
अमोल कांबळे (संग्रहित संपादित प्रतिमा)

कामाच्या प्रती असलेला प्रामाणिकपणा आणि कर्तव्यनिष्ठतेसाठी मुंबई पोलीस (Mumbai Police) खूप लोकप्रिय आहेत. मात्र आता विभागातील एक पोलीस त्याच्या डान्सच्या खास व्हिडिओंद्वारे प्रशंसा मिळवत आहे. मुंबई पोलीसमध्ये असणाऱ्या 38 वर्षीय अमोल कांबळे (Amol Yashwant Kamble) यांच्या डान्सचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर धुमाकूळ घालत आहे. नायगाव पोलीस मुख्यालयात तैनात असणाऱ्या हवालदार अमोल यांचे डान्स व्हिडिओ व्हायरल होत आहेत आणि हजारो लोक त्यांचा व्हिडिओ पसंत करत आहेत. ड्यूटी संपल्यावर किंवा सुट्टीच्या दिवशी अमोल डान्स करतात.

अमोल यांनी आपला एक डान्स व्हिडिओ सोशल मीडिया अॅप इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता, त्यानंतर त्यांची प्रतिभा लोकांसमोर आली. काही दिवसांपूर्वी अमोल यांनी 'अप्पू राजा' या मराठी चित्रपटातील 'आया है राजा' या गाण्यावर नृत्य केले आणि एक व्हिडिओ बनवला. हा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला होता व अल्पावधीतच तो व्हायरल झाला. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी अमोल यांचे कौतुक केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Amol Kamble (@amolkamble2799)

माहिमचे रहिवासी असलेले अमोल यशवंत कांबळे 2004 मध्ये मुंबई पोलिसात भरती झाले होते. अमोल यांना लहानपणापासूनच नृत्याची आवड होती. पोलिसात भरती होण्यापूर्वी अमोल त्यांच्या मोठ्या भावासोबत ‘डान्स शो’ करायचे जे नृत्यदिग्दर्शक आहेत. (हेही वाचा: Drunk Girl Viral Video: उच्चशिक्षीत मद्यधुंद तरुणीचा टिळक रस्त्यावर धिंगाणा, पुणे येथील हिराबाग चौकातील घटना; व्हिडिओ व्हायरल)

 

View this post on Instagram

 

A post shared by Amol Kamble (@amolkamble2799)

कांबळे म्हणाले की, ‘एक पोलीस म्हणून कायदा आणि सुव्यवस्था राखण्याबरोबरच नागरिकांची सुरक्षा करणे ही माझी पहिली जबाबदारी आहे. पण माझ्या आठवड्याच्या सुट्टीत मी डान्स करतो आणि माझ्या मुलांसोबत, माझ्या बहिणीच्या मुलांसोबत मजा करतो. अमोल यांच्या इन्स्टाग्राम खात्यावर त्यांनी अनेक डान्स व्हिडिओ पोस्ट केले आहेत, जे पाहून तुम्हालाही सुखद धक्का बसेल.