Drunk Girl Viral Video: उच्चशिक्षीत मद्यधुंद तरुणीचा टिळक रस्त्यावर धिंगाणा, पुणे येथील हिराबाग चौकातील घटना; व्हिडिओ व्हायरल
Pune Drunk Girl Viral Video | (Photo Credits: YouTube)

पुणे (Pune ) शहरातील रहदारीचा समजल्या जाणाऱ्या टिळक रस्त्यावरील हिराबाग चौकात एका मद्यधुंद तरुणीने ( Drunk Girl) धिंगाणा घातल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल (Pune Drunk Girl Viral Video) झाला आहे. व्हायरल व्हिडिओतील तरुणीची ओळख समजू शकली नाही. परंतू, तिने रस्त्यावर ज्या प्रकारे धिंगाणा घातला. त्यामुळे रहदारीचा खोळंबा तर झालाच. परंतू, उपस्थितांचेही मनोरंजन झाले. तरुणीच्या वर्तनामुळे काहींना नाहक मनस्तापही सहन करावा लागला. मध्यरात्री 11 च्या सुमारास ही घटना घडली. सदर तरुणी उच्चशिक्षित असल्याचे समजते.

मद्यधुंद तरुणी ही टिळक रोडवरील हिराबाग चौकात आली. तिने या चौकातील रस्त्यावर ठिय्या मांडला. थोड्याच वेळात ती रस्त्यावर झोपली. तोंडाने शब्दोच्चार नीटसे न झाल्याने बरळत असलेली ही तरुणी रस्त्यावरच आडवे-तिडवे लोळू लागली. त्यामुळे वाहन चालकांना आपल्या वाहनाचा वेग कमी करुन वाहने हळुवार हकावी लागली. परिणामी पाठिमागील वाहनांनाही आपला वेग कमी करावा लागला. आजूबाजूचे पादचारीही महिलेच्या या विचित्र वागण्याकडे पाहात होते. काहींनी या विचित्र पकाराचे व्हिडिओ शुटींग केले. दरम्यान, या प्रकाराचा माहिती पोलिसांना समजली.

संबंधित महिलेबाबत माहिती मिळताच पुणे पोलीस घटनास्थळी आले. त्यांनी संबंधीत महिलेला ताब्यात घेतले आणि तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. ही घटना मंगळवारी (3 जून) रात्री11 वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याची माहिती नाही. तसेच, ही तरुणी नेमकी कोण आहे. तिने हा सगळा राडा नेमका कोणत्या कारणास्तव केला याबाबतही माहिती मिळू शकली नाही. (हेही वाचा, Aurangabad: मद्यधूंद 'ती' बेधुंद झाली, कुख्यात गुंडासोबत कारवर नाचली; औरंगाबाद येथे कायद्याची पायमल्ली जनतेने भररस्त्यात पाहिली)

व्हिडिओ

दरम्यान, अशा प्रकारच्या घटना या आधीही घडल्या आहेत. सोशल मीडियावर त्या व्हायरलही झाल्या आहेत. एका मद्यधूंद महिलेने पोलीस स्टेशनमध्येच धिंगाना घातला होता. संबंधित महिला ही पोलिसांनाही असभ्य भाषेत बोलत होती. शिवाय नशेच्या भरात तिने शिवीगाळही केली होती. अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर पोलिसांनीही या मंडळींवर कायदेशीर कारवाई करत आपला खाक्या दाखवून दिला आहे.