Mumbai: अभिनेत्रीला अंडरगारमेंट्स, सेक्स टाॅय पाठवणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा पोलिसांकडून तपास सुरु
Sex Toys (Photo- Wikimedia Commons)

आंबोली पोलीस एका अशा व्यक्तीचा शोध घेत आहे जो गेल्या दोन महिन्यांपासून एका अभिनेत्रीला अंडरगार्मेंट आणि सेक्स टॉईज पाठवत आहे. अभिनेत्रीने सुरुवातीला त्याकडे दुर्लक्ष करणे पसंत केले; मात्र, या तिला पाठवण्यात येणाऱ्या गोष्टी सुरू राहिल्याने तिने पोलिसांशी संपर्क साधण्याचा निर्णय घेतला. पोलिसांनी सांगितले की, अभिनेत्रीला किमान सात ते आठ वेळा अशा वस्तू मिळाल्या आहेत. (Sex With Student: सेंट लुईस काउंटी हायस्कूलमधील माजी कर्मचाऱ्याकडून विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार)

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, जोगेश्वरी येथील 28 वर्षीय रहिवासी जी व्यवसायाने अभिनेत्री आहे तिला गेल्या दोन महिन्यांपूर्वी एका अज्ञात व्यक्तीकडून पार्सल मिळत आहे. सुरुवातीला तिला वाटले की कोणीतरी खोडसाळपणा म्हणून या अशा वस्तु पाठवत आहे. त्यानंतर तिला जवळजवळ प्रत्येक शॉपिंग पोर्टलवरून पाठवलेले एकसारखे पार्सल मिळाले. सततच्या छळाला कंटाळून मग अभिनेत्रीने आंबोली पोलिसांकडे तक्रार दाखल केली. 'आम्ही अज्ञात आरोपीवर भारतीय दंड संहितेच्या कलम 509 (शब्द, हावभाव किंवा महिलेचा विनयभंग करण्याचा हेतू) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे', असे आंबोली पोलीस ठाण्याच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

अधिकारी म्हणाले की, एफआयआर नोंदवण्यात आल्यापासून महिलेला अद्याप असे कोणतेही पार्सल मिळाले नाही. आम्हाला काही मोबाईल नंबर सापडले आहेत ज्यातून शॉपिंग पोर्टलवर ऑर्डर देण्यात आले होते; तथापि, आम्ही अद्याप नंबरचे ठिकाण शोधू शकलो नाही, असे ही अधिकाऱ्याने सांगितले.