Mukesh Ambani | (Photo Credits-Facebook)

जगातील 10 सर्वात श्रीमंत उद्योजकांपैकी एक आणि ‘रिलायन्स’ उद्योग समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात आजोबा झाले होते. मुकेश अंबानी यांचे पुत्र आकाशची (Akash Ambani) पत्नी श्लोकाने (Shloka Mehta) 10 डिसेंबरला मुलाला जन्म दिला आहे. दरम्यान, आजोबा झाल्याच्या आनंदात मुकेश अंबानी हे जिओच्या (Jio) वापरकर्त्यांना मोफत 555 रुपयांचा रिचार्ज देत आहेत, अशा एक मॅसेज सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हायरल मॅसेजचा खुलासा झाला आहे. महत्वाचे म्हणजे, जिओकडून त्यांच्या वापरकर्त्यांना अशी कोणतीच ऑफर देण्यात न आल्याची माहिती समोर आली आहे.

सोशल मीडियामध्ये व्हायरल होत असलेल्या मॅसेजमध्ये असे सांगण्यात आले आहे की, "मुकेश अंबानी हे आजोबा झालाच्या आनंदात जिओच्या सर्व वापरकर्त्यांना मोफत 555 रुपयांचा रिचार्ज देत आहेत. मी स्वत: मोफत रिचार्ज केला आहे. जर तुम्हालाही मोफत रिचार्ज करायचा असेल तर, https://cutt.ly/Nl4narg या लिंकवर क्लिक करा आणि मोफत रिचार्ज मिळवा. ही ऑफर केवळ 30 मार्च 2021 पर्यंत मर्यादित आहे". मात्र, हा मॅसेज खोटा असून जिओकडून त्यांच्या वापरकर्त्यांसाठी अशी कोणतीही ऑफर कधीच जाहीर केलेली नाही. एवढेच नव्हेतर, वर दिलेली लिंकदेखील बनावट बेवसाईटची आहे. हे देखील वाचा- अचानक रेल्वे ट्रॅकवर दाखल झालेल्या हत्तीची सैर कॅमेऱ्यात कैद (Watch Viral Video)

ट्वीट-

सध्या सायबर गुन्हेगार नागरिकांना लुबाडण्यासाठी विविध पर्यायांचा उपयोग करत आहे. यामुळे नागरिकांनी अशाप्रकारच्या कोणत्याही अफवांना बळी पडू नये. तसेच व्हॉट्सअप, फेसबूक, इंस्टाग्राम यांच्यासरख्या अॅपवर आलेल्या लिंकवर क्लिक करू नये. यामुळे तुमच्या खात्यातील पैसे गायब होण्याची शक्यता आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अशा अफवांचा सायबर क्राईम सेल नेहमीच पर्दाफाश करते. परंतु, नागरिकांनीही सावधान राहण्याची अधिक गरज आहे.