Viral Video (Photo Credits: Twitter)

केवळ जंगलातच नाही तर सर्कस किंवा काही वेळा रहिवासी परिसरात हत्तीचे (Elephant) दर्शन घडते. हत्तीचं डुलत चालणं अनेकांना भावतं. पण अचानक हत्ती समोर आल्याने भीतीही वाटते. दरम्यान, हत्तीचा एक अनोखा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत आहे. यात हत्ती चक्क रेल्वे ट्रॅकवरुन (Railway Track) चालत आहे. रेल्वे स्टेशनवर हत्ती अचानक दाखल होतो आणि रेल्वे ट्रॅकवर चालू लागतो. हत्तीच्या या व्हिडिओला नेटकऱ्यांकडून तुफान प्रतिसाद मिळत आहे.

हा व्हिडिओ आयपीएस ऑफिसर दीपांशु काबरा (Dipanshu Kabra) ने शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना त्यांनी लिहिले की, प्रवाशांनी कृपया लक्ष द्यावे. गजानन एक्सप्रेस काही वेळासाठी प्लॅटफॉर्म क्रमांक 6 वरुन जात आहे. आपआपले कॅमेरे काढा आणि सुरक्षित अंतर ठेवा. हा व्हिडिओ त्यांनी 27 मार्च रोजी शेअर केला होता. आतापर्यंत या व्हिडिओला 22.7K व्ह्युज मिळाले असून 332 रीट्विटस आणि 2.2K लाईक्स मिळाले आहेत.

पहा व्हिडिओ:

या व्हिडिओवर युजर्सच्या जबरदस्त प्रतिक्रीया येत आहेत. एका युजरने हा व्हिडिओ हरिद्वार रेल्वे स्टेशनचा असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, या व्हिडिओत तुम्ही पाहू शकाल की, एक हत्ती अचानक रेल्वे स्टेशनवर दाखल होतो आणि ट्रॅकवर वेगाने चालू लागतो. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून मागून इतर आवाजही ऐकू येत आहेत.