आधीच मर्कट तशातच मद्य प्याला, मग वृश्चिकदंश झाला त्याला, मग झाली तयाला भूतबाधा,काय वर्णू लीला त्या कपिच्या अगाधा, असे सुभाषीत आपण नेहमीच ऐकतो. पण, कधीकधी खरोखरच अशा घटना घडतात. ज्यामुळे या सुभाषीताचे प्रत्यंतर पाहायला मिळते. एका माकडाने (Monkey) आरसा (Mirror) पाहिला आणि त्यानंतर त्याने जे काही केले ते या सुभाषीताला साजेसे असेच. होय, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये माकड आरशात पाहून (Monkey Looking In Mirror)अशा काही गमतीजमती करत आहे की, ते पाहून कोणालाही मोठी गंमत वाटेल. केवळ आठ सेकंदाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर अनेकांच्या कौतुक, विनोद आणि आनंदाचा विषय ठरला आहे.
आरसा पाहून माकडाला बसला धक्का
आरसा पाहणे, आरसा दाखवणे, मर्कटलीला हे तसे भाषीक वाक्प्रचार. पण भाषेतील कोणताही शब्द, अलंकार, वाक्प्रचार, म्हण, उपमा, अलंकार असे काहीही तयार व्हायचे असेल तर त्याला कारणही तसेच घडते. आता या व्हिडिओतच पाहा ना. एक माकड एका दुचाकीवर बसले आहे. चुकून त्याचे लक्ष दुचाकीला असलेल्या आरशाकडे जाते. सहाजिकच त्याला त्या आरशात स्वत:चे प्रतिबींब पाहायला मिळते. हे प्रतिबिंब पाहताच त्या माकडाला मोठा धक्का बसतो. त्याला असे वाटते की, आपल्यासारखेच कोणीतरी आणि तेही इतक्या जवळ बसले आहे. ते आरशात स्वत:ला न्याहाळते आणि आरशाच्या पाठिमागे चाचपून पाहते. त्याला वाटते समोर दुसरे कोणते तरी माकड आहे. माकड सातत्याने आरशाच्या पाठी चाचपून पाहते. पण, त्याला आरशाच्या पाठिमागे कोणीच दिसतनाही. ते नुसतेच हवेवत हात फिरवत राहते. मात्र, आरशातील प्रतिबींब पाहून आपला शोध सुरुच ठेवते. (हेही वाचा, International Monkey Day 2019: माकडांबद्दल 'या' गोष्टी तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या)
व्हिडिओ X वर व्हायरल
सोशल मीडिया मंच X वर @dc_sanjay_jas नावाच्या हँडलवरुन संजय कुमार या वापरकर्त्याने हा व्हिडिओ तासाभरापूर्वी सामायिक केला आहे. हे वृत्त लिहीपर्यंत तासाभरात हा व्हिडिओ जवळपास एक हजार वापरकर्त्यांनी पाहिला होता. व्हिडिओ पाहणाऱ्यांची संख्या वाढते आहे. अनेकांनी व्हिडिओ पाहून मजेशिर प्रतिक्रियाही दिल्या आहेत. (हेही वाचा, Langur Posters in Moradabad: माकडांना हाकलण्यासाठी बस स्थानकांवर लंगूरचे फोटो आणि फायर साऊंड सेन्सर मशीन, मुरादाबाद येथील घटना)
व्हिडिओ
कैप्शन..! pic.twitter.com/22R6Cf1Y4E
— Sanjay Kumar, Dy. Collector (@dc_sanjay_jas) April 17, 2024
दरम्यान, माणूस आणि माकड यांच्यात तसे बरेच साम्य पाहायला मिळते. माकडामध्ये असलेले जवळपास सर्व गुण माणसात दिसतात. त्यामुळे माणसात असलेले गुण माकडात दिसणे हे देखील सहाजिकच. त्यामुळे कोणतेही माकड जर मानवाप्रमाणे वर्तन करु लागले तर त्यात फार आश्चर्य वाटण्याचे तसे काहीच कारण नाही. अर्थात मानवाइतका त्याचा मेंदू विकसीत न झाल्याने आकलनाच्या पातळीवर काही चुका निश्चित होतात. पण, सर्वसाधारणपणे त्याचे गुण मानवीच असतात. व्हायरल व्हिडिओमध्येही असेच काहीसे जाणवते.