भोजपूरी अभिनेत्री मोनालिसा हिने शेअर केला बाथटबमध्ये स्नान करतानाचा व्हिडिओ

भोजपूरी अभिनेत्री (Bhojpuri Actress) मोनालिसा (Monolisa) ही नेहमी तिच्या बोल्ड अंदाजामुळे  चर्चेत असते. यातच मोनालिसा हीने स्वत: बाथटबमध्ये स्नान करतानाचा व्हिडिओ शेअर केल्याने पुन्हा एकदा ती चर्चेचा विषय ठरली आहे. या व्हिडिओमध्ये ती आपल्या टी.व्ही. शोचे प्रमोशन करत आहे. हा व्हिडिओ 'नजर' या टीव्ही शोचा प्रोमो असून या कार्यक्रमाचा पहिला एपिसोड बघितलाच पाहिजे, असे आवाहन मोनालिसाने सर्व चाहत्यांना केले आहे. या शोमध्ये ती डायनची भूमिका साकरणार असल्याची माहिती समोर आली आहे.

मोनालिसा सोशल मीडियावर बरीच ऍक्टिव्ह असते. तसेच नेहमी नवे फोटो आणि व्हिडिओ ती शेअर करत असते. 3 महिन्यापूर्वी तिने एक बोल्ड अंदाजातील फोटो शूट करुन शेअर केला होता. यामुळे ती दिर्घकाळ चर्चेत होती. यातच तिने बाथटबमध्ये स्नान करतानाचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करुन खळबळ उडवून दिली आहे. भोजपूरी सिनेमांचा मोठा प्रक्षकवर्ग आता देशातही निर्माण झाला आहे. महत्त्वाचे म्हणजे, देशभरात भोजपूरी गाण्याचे दिवाने निर्माण झाले असून या गाण्याचे रिमिक्सही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असते. हे देखील वाचा- शाळेला वैतागलेल्या 'या' चिमुरडीचा राग झाला अनावर... थेट सरकारला दिली 'गोड धमकी' (Watch Video)

 

View this post on Instagram

 

Tonight 🔥🔥... #nazar at 11pm on @starplus

A post shared by MONALISA (@aslimonalisa) on

मोनालिसाने भोजपूरी सिनेमांमध्ये अनेक मोठ्या कलाकरांसोबत काम केले आहे. भोजपूरी अभिनेता पवन सिंह आणि मोनालिसा यांच्या जोडीला अधिक पसंती दर्शवली जाते. मोनालिसाने 100 हून अधिक भोजपूरी सिनेमात काम केले आहे. एवढेच नव्हे तर, भोजपूरी इंडस्ट्रीमध्ये सर्वाधिक मानधन घेणाऱ्यांच्या यादीत मोनालिसाचे नाव आहे. सध्या ती मोठ्या पडद्यापासून लांब आहे. तिने पुन्हा भोजपूरी सिनेमात कमबॅक करावा, अशी चाहत्यांची इच्छा आहे.