शाळेला वैतागलेल्या 'या' चिमुरडीचा राग झाला अनावर... थेट सरकारला दिली 'गोड धमकी' (Watch Video)
Little girl goes viral for complaining about school (Photo Credits: Video Grab)

Happy Children's Day 2019:  बालपण हे निरागस असतं, त्यामुळेच चिमुरड्यांचं भावविश्व आणि त्यांच्या कल्पना या मोठ्यांना अनेकदा थक्क करणार्‍या असतात. आजकाल वाढती स्पर्धा, अभ्यासाचा तणाव यामुळे वैतागलेल्या एका चिमुरडीचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर सोशल मीडियामधूनही सध्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. चिमुरडीचं हे गोंडसं टेन्शन पाहून अनेकांना आज शाळेच्या दिवसांची आठवण झाली असेल. सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये चिमुरडी गुजराती भाषेत बोलताना दिसत आहे. यामध्ये सकाळी उठून शाळेत जावं लागतं, त्यानंतर विविध विषयांचा अभ्यास करावा लागतो.. इतक्याश्या जीवाला किती ते कष्ट! हे पहा या चिमुकलीच्या व्हिडिओमधून

पहा या चिमुकलीचा अंदाज

शाळा ज्याने बनवली त्या व्यक्तीबद्दलही या चिमुरडीने आपला रोष व्यक्त केला आहे. तसेच मोदीजींना देखील एकदा हरवलं पाहिजे असं देखील तिनं म्हटलं आहे. हेही वाचा: नरेंद्र मोदी यांचा चिमुकला 'Special Friend' नेमका आहे तरी कोण? (See Photo)

पहा ट्विटरवरील काही मजेशीर प्रतिक्रिया

ट्वीट 1  

ट्वीट 2     

आज 14 नोव्हेंबर हा बालदिन आहे. भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीचं औचित्य साधून त्यांना लहान मुलांची विशेष आवड असल्याने 14 नोव्हेंबर दिवशी बालदिन साजरा केला जातो. आजकाल सोशल मीडियाच्या माध्यमातून अशाप्रकारे लहान मुलांच्या व्हीडिओ अनेक गंमती जंमती व्हायरल होताना आपण पाहिले आहे.