मनसे अध्यक्ष राज ठाकरे (फोटो सौजन्य-फेसबुक)

लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Elections2019) पार्श्वभूमीवर देशभरात सर्वच राजकीय पक्ष जोरदार प्रचार करताना पाहायला मिळत आहेत.मात्र यंदाच्या निवडणुकीत प्रत्यक्ष उमेदवारीने सहभागी नसलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackrey) मात्र वेगळ्याच कारणावरून चर्चेत आहेत. आपल्या तडफदार भाषण शैलीने महाराष्ट्र्रातील जनतेच्या मनात स्थान निर्माण केलेल्या राज ठाकरेंनी ठिकठिकाणी सभा घेत भाजपा व पंतप्रधान मोदींच्या विरोधात प्रचार करण्याचा पवित्रा स्वीकारला आहे. या निम्मिताने सध्या कार्यरत असणाऱ्या सरकारवर आपल्या शब्दांची अस्त्रे सोडताना राज यांनी या राजकारण्यांच्या भाषणातील व्हिडियोंचे पुरावे ही दिले आहेत.

राज यांच्या सभांमध्ये हे व्हिडिओ मोठ्या पडद्यावर दाखवायला सांगताना राज ठाकरे कार्यकर्त्यांना ‘लाव रे तो व्हिडिओ’ म्हणताना दिसतात. नेटकऱ्यांनी आता याच ‘लाव रे तो व्हिडिओ वाक्याचा आधार घेत सोशल मीडियावर मिम्स व्हायरल करायला सुरवात केलीय.

या मिम्स बनवणाऱ्या काही मंडळींनी राज यांच्या या शैलीचं कौतुक केलयं तरी काहींनी याउलट राज यांनाच ट्रॉल करत मनसे वरील आरॊपांचे व्हिडियो देखील आमच्याकडे आहेत असे सांगणारे मिम्स बनवले आहेत. राज ठाकरे साहेब जरा सांभाळून... आमच्याकडे सुद्धा आहेत व्हिडिओ, भाजप पक्षाने उडविली खिल्ली

सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारे काही मिम्स

ॲड.अनंत खेळकर

अकाेला

धास्ती..

——-

ऐ लाव रे तो व्हीडीओ ,म्हणताच

ह्यांच्या काळजात धस्स झाले

‘राज’ कारण सांगत आहे

आता ‘थापा’ मारणे बस्स झाले

त्यांच्या मुखवट्याची हल्ली

‘हरी’-‘साल’ काढत आहे

पांघरलेले बुरखे सुध्दा

टराटरा फाडत आहे pic.twitter.com/GfRWYxwQb9

— Gajanan Kale MNS (@GajananKaleMNS) April 17, 2019

राज यांनी मागील आठवड्याभरापासून महाराष्ट्रातील काही ठिकाणी जाहीर सभा घेतल्या आहेत.  12 एप्रिल रोजी नांदेडमध्ये, 15 एप्रिल रोजी सोलापूर तर मंगळवारी कोल्हापूरमधील इचलकरंजी येथे राज ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारासाठी सभा घेतल्या. नांदेड येथील सभेपासूनच राज्यभरात राज यांच्या दौऱ्याची चर्चा चांगलीच रंगली.