Marathi Bridal Best Entry (Photo Credits: Youtube)

लग्नसराईचा मौसम सुरु झाला आहे. त्यामुळे कोविड-19 च्या संकटातही अनेक ठिकाणी छोटेखानी विवाहसोहळे पार पडत आहेत. विवाहसोहळा म्हटलं की नाचगाणं आलंच. हळदीला, वरातीला नाचायला मिळणार म्हणून अनेक मंडळी खूश असतात. ही उत्सुकता, आनंद कोरोनाच्या संकटातही विशेष काळजी घेत कायम असलेला पाहायला मिळाला. दरम्यान, आजकाल नवरा-नवरी ने लग्नमंडपात हटके एन्ट्री करण्याचा ट्रेंड सुरु झाला आहे. काही वेळेस नातेवाईक खास डान्सने नवरा-नवरीचे स्वागत करताना दिसतात. साखरपुड्यापासून ते अगदी लग्नापर्यंत नवरा-नवरी किंवा दोघेही डान्स करतानाचे अनेक व्हिडिओज तुम्ही यापूर्वी पाहिले असतील. असाच एक धम्माल व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत नवरी मुलगी धमाकेदार डान्ससह लग्नमंडपात एन्ट्री करताना दिसत आहे.

नवरी मुलगी एक पहेली लीला या सिनेमातील 'मेरे सैय्या सुपरस्टार' या गाण्यावर नाचताना दिसत आहे. तिचा डान्स, उत्साह पाहून मंडपातील सर्वजण तिला चिअर करत आहेत. तर काहीजण तिचे व्हिडिओ शूट करत आहेत. शेवटी तिचा होणारा नवरा देखील तिचं कौतुक करताना दिसत आहे. नवरी मुलीचा उत्साह, हौस आणि नवऱ्याप्रती असलेले प्रेम, कौतुक यातून व्यक्त होते.

पहा व्हिडिओ:

हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर झाल्यानंतर त्यावर विविध कमेंट्स येऊ लागला. काहींनी तिचे कौतुक केले. तर काहींनी नाकं मुरडली. साधारणपणे आपल्याकडे मुलींनी लग्नात लाजलं पाहिजे, अदबीत राहिलं पाहिजं अशी मानसिकता आहे. त्यामुळे अशा मानसिकतेच्या लोकांना या मुलीचा हा बिनधास्तपणा नक्कीच भावला नसेल. परंतु, असो. लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील खास क्षण. ते कसे एन्जॉय करायचे याचे स्वातंत्र्य आपल्याला असायला हवे.