Man Spitting on Rotis: रोटी बनवताना त्यावर थुंकत असल्याचा किळसवाणा प्रकार; गाझियाबाद पोलिसांकडून Mohammad Mohsin ला अटक (Watch Video)
Man spits on rotis at Wedding in Ghaziabad (Photo Credits: Twitter)

अन्न पदार्थांद्वारे लोकांच्या जीवाशी खेळण्याचे अनेक धक्कादायक प्रकार याआधी समोर आले आहेत. मुंबईच्या रेल्वे स्टेशनवर घाणेरड्या हातांनी ज्यूस बनवण्यात येत असल्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. आता मेरठनंतर गाझियाबादमध्ये (Ghaziabad) तंदूर नानमध्ये थुंकण्याचा (Spitting) व्हिडिओ समोर आला आहे, या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत आरोपी मोहम्मद मोहसीनला अटक केली आहे.  सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक व्यक्ती रोटी तंदूरमध्ये घालण्याआधी त्यावर थुंकत आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांमध्ये संताप पसरला होता. या व्यक्तीचे कृत्य पाहून अनेकांनी कारवाईची मागणी केली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 11 मार्च रोजी गाझियाबाद जिल्ह्यातील भोजपूर भागात घडली. गाझियाबादमध्ये एक साखरपुड्याचा कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमात रोटी बनवताना मोहम्मद मोहसीन रोटीमध्ये थुंकत होता. शुक्रवारी मोहसीनला जेव्हा या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे समजले तेव्हा तो आपल्या कुटुंबातील सदस्यांसह गावातून पळून गेला. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर गाझियाबाद पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली. सर्वप्रथम हा व्हिडिओ खरा आहे की नाही याची पुष्टी केली गेली. त्यानंतर केटरिंग कंपनीशी संपर्क साधला ज्यांनी मोहसीनला कामावर ठेवले होते.

त्यावेळी मोहसीन हा गाझियाबादच्या मुरादनगर येथील साहबिसवाचा रहिवासी असल्याचे समजले. पोलिस त्याला अटक करण्यासाठी त्याच्या घरी पोहोचले परंतु तोपर्यंत मोहसीन तेथून पळून गेला होता. त्यानंतर पोलिसांनी तातडीने शोध सुरु केला व अखेर त्याला अटक केली. व्हिडिओ शेअर करताना सुप्रीम कोर्टाचे वकील प्रशांत पटेल यांनी लिहिले की, ‘करीम, सलीम इत्यादि किसी किसी की भी बिरयानी या मोमिन के घर में स्वाद से खाने वाले सभी थूका हुआ खा रहे हैं।‘ (हेही वाचा: Meerut: भर रस्त्यात छेड काढणाऱ्या तरुणाला विद्यार्थिनीने दाखवला हिसका; दांडक्याने केली मारहाण, दोन जणांना अटक (Watch Video)

अशीच एक घटना मेरठमध्येही घडली होती. जिथे नौशाद नावाची व्यक्ती रोटी बनवताना त्यावर थुंकत असल्याचे दिसून आले होते. चौकशीदरम्यान गेले 10 वर्षे तो अशाप्रकारे रोटीवर थुंकत असल्याचे त्याने कबूल केले.