Thailand मध्ये परदेशी पतीच्या अपरोक्ष पत्नीने लॉटरी जिंकून मांडला दुसरा संसार
Cheating | Pixabay.com

थायलंड (Thailand) मध्ये एका महिलेने 2.9 कोटी रूपयांची लॉटरी जिंकल्यानंतर आपल्या पतीला सोडून दुसर्‍या पुरूषासोबत लग्न केल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. Thaiger, च्या रिपोर्ट्सनुसार 47 वर्षीय Narin या व्यक्तीने आपल्या पत्नीने केलेल्या आपल्या फसवणूकीविरोधात कोर्टात दाद मागितली आहे. 11 मार्चला याबाबतची याचिका दाखल आहे. 20 वर्षांपूर्वी या पीडीत पुरूषाचे लग्न झाले होते आणि त्याला 3 मुली देखील आहे.

मीडीया रिपोर्ट्सनुसार, Narin वर 2 million baht चं कर्ज आहे. त्याने 2014 साली साऊथ कोरियामध्ये जाण्याचा आणि हा कर्जाचा भार तेथे नोकरी करून कमी करण्याचा प्रयत्न केला. साऊथ कोरिया मध्ये काम करत असताना त्याने पत्नी आणि मुलींसाठी दरमहा 27-30 बाथ पाठवले. नंतर त्याची पत्नी Chaweewan पुन्हा थायलंड मध्ये परतली होती.

दरम्यान पत्नीने 2.9 कोटी रूपयांची लॉटरी जिंकली होती पण ही बाब तिने पतीपासून मात्र लपवली होती. Narin आपली पत्नी फोन कॉल्स उचलत नसल्याने थायलंडला 3 मार्चला परतला. मात्र तेव्हा त्याला जे समजलं त्याने त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. थायलंडमध्ये Chaweewan 25 फेब्रुवारीला एका पोलिस ऑफिसरसोबत विवाहबद्ध झाली होती.

आपली पत्नी दुसर्‍यासोबत विवाहबद्ध झाली आहे हे पाहून Narin ला धक्का बसला. त्याला काय करावं सूचेना. 20 वर्षांच्या संसारानंतर आपली पत्नी धोका देऊ शकते ही बाब त्याच्या पचनी पडतच नव्हती. पत्नीलाच दरमहा पैसे दिल्याने त्याच्याकडे अवघे 60 हजार बाथ उरले होते. आता त्याने न्यायासोबतच त्याचे पैसे देखील परत मिळावे यासाठी आवाज उठवला आहे.

Chaweewan ने मात्र आपण लॉटरी जिंकण्यापूर्वीच आणि प्रियकरासोबत दुसरं लग्न करण्यापूर्वीच Narin सोबतचे संबंध तोडले होते असा दावा केला आहे. पण Narin ने हे दावे फेटाळले आहेत.