महाराष्ट्र: डबक्यातील पाणी पिण्यासाठी आलेल्या हरणावर अजगराचा हल्ला (Watch Video)
Python attacks deer (Photo Credits: YouTube Grab)

चंद्रपूर येथील जंगलातील अजगराचा एक धक्कदायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये अजगर डबक्यातील पाणी पिण्यासाठी आलेल्या हरणावर हल्ला करत असल्याचा प्रकार समोर आला आहे. हरण पाणी पिण्याची वेळ साधत अजगराने त्याचवेळी हल्ला केला आहे. अजगर हे मुख्यत्वे विषारी नसतात पण एखादी शिकार केल्यास त्याला ठार मारतात. जंगलातील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीत ही घटना कैद झाली आहे. गेल्या आठवड्यात सीसीटीव्हीचे हे फुटेज वनविभागाकडून सोशल मीडियात प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर प्रचंड व्हायरल होत आहे.

डबक्यातील पाणी पिणारे हरिण बेसावध असतानाच अजगराने हल्ला केला. हल्ला केल्यानंतर अजगर त्या हरणाला पाण्यात ओढण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी आजूबाजूला असणाऱ्या हरणांनी हे पाहून धक्का बसला त्याला वाचवण्याचा सुद्धा प्रयत्न केला. परंतु अजगराने हरणाला डबक्यातील दलदलीत ओढून गिळंकृत केले होते. सीसीटीव्ही मधील हे फुटेज सेंट्रल चंदा फॉरेस्ट डिपार्टमेंट यांनी प्रसारित केला आहे.(पिसाळलेल्या बैलाला आवरण्यासाठी जेसीबी ने चिरडून केली या मुक्या जनावराची क्रूर हत्या, व्हिडिओ पाहून तुमचाही राग होईल अनावर Watch Video)

यापूर्वी सुद्धा अजगाराने हल्ला केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. गेल्याच आठवड्यात बिबड्या आणि अजगर यांच्यामधील हल्ल्याचे चित्र एका फोटोग्राफरने कैद केले. ही घटना मसई मेरा नॅशनल पार्क येथील असून अजगरने बिबट्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला परंतु बिबट्याने आपल्या शिकारीवर मात केली. त्यानंतर झालेल्या चढाईनंतर बिबट्याने अजगराला चिरडले.