Madhya Pradesh: चालत्या ट्रेनमध्ये चढताना घसरला पाय, RPF जवानाच्या प्रसंगावधानामुळे वाचला जीव (Video)
CCTV | (Photo Credits-Twitter)

अत्यंत निष्काळजीपणे चालत्या ट्रेनमध्ये चढणाऱ्या युवकाचा पाय घसरला. तो चालत्या ट्रेनखाली येणार इतक्यात रेल्वे पोलीस फोर्स (RPF) जवानाने प्रसंगावधान दाखवले. त्या तरुणाचा जीव वाचला. डोळ्याचे पाते लवते न लवते इतक्यात घडलेली ही अत्यंत थरारक घटना सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाली आहे. इंदौर रेल्वे स्टेशन (Indore Railway Station) फलाट क्रमांक तीनवर ही घटना 13 एप्रिल (2021) या दिवशी घडली घडली. मध्य प्रदेश (Madhya Pradesh) आरपीएफ जवानाने दाखवलेल्या प्रसंगावधानाचे सर्वत्र कौतुक होत आहे. जितेन्द्र कुमार सामवेदी या आरपीएफ जवानाचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, दोन प्रवासी प्रवासाला निघण्यासाठी इदौर रेल्वे स्थानकावर आले होते. ते अपेक्षीत फलाटावर पोहोचले. परंतू, तोवर रेल्वे सुरु झाली. त्यामुळे त्यांनी धावत धावत रेल्वे पकडण्यास सुरुवात केली. ते कसेबसे रेल्वेत चढले खरे. परंतू, इतक्यात त्यातील एकाचा पाय सटकला आणि तो फलाटावर पडला. दुसरा प्रवासीही त्याच्यासोबत घसरुन पडला. दोघेही रेल्वे फलाटावर रल्वेसोबत फरफटत निघाले. दरम्यान, ही बाब फराटावर असलेल्या रेल्वे सुरक्षा जवानाच्या नजरेस पडली. त्याने धावत जाऊन त्यातील एकाला खेचले आणि बाजूला काढले. त्याच्यासोबत दुसरा व्यक्तीही बाजूला खेचला गेला. पर्यायाने दोन्ही प्रवाशांचे प्राण आरपीएफ जवानामुळे वाचले. (हेही वाचा, पनवेल रेल्वे स्थानकात RPF जवानाच्या प्रसंगावधानामुळे वाचले अपंग प्रवाशाचे प्राण (Watch Video))

या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पुढे आले आहे. या व्हिडित दिसते की रेल्वे प्रवासादरम्यान दोन प्रवासी अत्यंत घाईगडबडीत रेल्वेत चढत आहेत. या गडबडीत पाय घसरुन त्यातील एकजण खाली पडतो. घाबरुन गेलेला हा प्रवासी मदतीसाठी मोठ्या आवाजात ओरडतो. हा आवाज ऐकून आरपीएफ जवान मदतीला धावला. त्याने दोघांचेही प्राण वाचवले.