Lovers romance on moving bikes (PC - Twitter)

Ghaziabad: गाझियाबादच्या इंदिरापुरम भागाजवळील NH9 येथून दोन प्रेमी युगुल चालत्या बाईकवर रोमान्स करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. गर्दीच्या रस्त्यावरून जात असताना दुचाकीवर एक पुरुष आणि एक स्त्री एकमेकांना घट्ट मिठी मारताना या व्हिडिओमध्ये दिसत आहेत. व्हिडिओमध्ये, बाईकरला समोर बसलेल्या महिला प्रियकराने मिठी मारलेली पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे रस्त्याच्या सुरक्षेशी तडजोड करणारा हा रोमान्स स्टंट बाईकस्वराने हेल्मेटशिवाय दुचाकी चालवत होता.

सध्या सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. तसेच अनेक नेटीझन्सनी या जोडप्यावर योग्य कारवाई करण्याची मागणी केली आहे. एका कार चारकाने या घटनेचा व्हिडिओ काढून तो यूपी पोलिसांना टॅक केला आहे. दरम्यान, व्हिडिओला प्रतिसाद देत, यूपी पोलिसांनी गाझियाबाद पोलिस युनिटला आवश्यक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. (हेही वाचा - Yoga In Local Train: मुंबई लोकल ट्रेनमध्ये प्रवाशांनी केला योगा; पहा व्हायरल व्हिडिओ)

अलिकडच्या काळात तरूणांचं रस्त्यावर स्टंटबाजी करण्याचं प्रमाण वाढलं आहे. अशा रोड रोडरोमिओंवर कारवाई झाली पाहिजे. या वर्षाच्या सुरुवातीस मार्चमध्ये व्हायरल झालेल्या व्हिडिओंपैकी एक जोडपे राजस्थानच्या जयपूरमधील B2 बायपासजवळ चालत्या बाईकवर रोमँटिक स्टंट करताना दिसलं होतं.

जानेवारीमध्ये नोंदवलेल्या आणखी एका प्रकरणात, छत्तीसगडमध्ये चोरीच्या बाईकवर आपल्या मैत्रिणीशी रोमान्स करताना एक व्यक्ती कॅमेऱ्यात कैद झाला होता. व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर दोघांना अटक करण्यात आली होती.