दिल्ली: कनॉट पॅलेस परिसरातील Ardor 2.1 हॉटेलमध्ये खास 'इलेक्शन स्पेशल थाळी'; एकाच ताटात 28 राज्यातील 28 पदार्थांची मेजवानी
Election Special Thali (Photo Credits: Instagram)

Election Special Thali:  सध्या देशभरात 17 व्या लोकसभा निवडणूकीचे (Lok Sabha Elections) वारे वाहायला सुरूवात झाली आहे. एकीकडे उमेदवार मतांचा जोगवा मागण्यासाठी हटके प्रचार तंत्र वापरत आहे तर नागरिकांमध्ये मतदान करण्यासाठी जागृतता निर्माण करण्यासाठी विविध स्तरातून प्रयत्न केले जात आहेत. अशामध्ये दिल्लीच्या कनॉट पॅलेस (Connaught Place) परिसरामध्ये Ardor 2.1 या हॉटेलमध्ये खास इलेक्शन थाळी (Election Special Thali) सुरू करण्यात आली आहे. यामध्ये 28 राज्यातील 28 खास पदार्थांची लज्जत एकाच वेळी चाखण्याची संधी उपलब्ध करून दिली जात आहे. सध्या सोशल मीडियामध्ये या थाळीचे फोटो व्हायरल होत आहे. Lok Sabha Election 2019: घरबसल्या मतदार यादीमध्ये तुमचं नाव, मतदान केंद्र कसं पहाल?

इलेक्शन थाळीचं वैशिष्ट्य

भारताच्या नकाशाच्या आकारात ग्राहकांना 28 राज्यातले 28 विविध पदार्थ उपलब्ध करून दिले जातात. यामध्ये महाराष्ट्राचा वडापाव, गुजरातचा ढोकळा ते बंगालचा राजभोग पासून गोवन फिश करी सारख्या चमचमीत पदार्थांची रेलचेल आहे. शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन विविध प्रकारामध्ये ही थाळी उपलब्ध आहे.

इलेक्शन स्पेशल थाळीचं वजान सुमारे 5.5 किलोग्राम आहे तर त्यामध्ये अंदाजे 10.5 किलो वजनाचं जेवण नियमित वाढलं जातं. भारताच्या नकाशाच्या आकारातील थाळी आणि राज्याच्या नेमक्या ठिकाणावर तेथील खास पदार्थ वाढला जात असल्याने लोकांमध्ये या थाळीची खास क्रेझ आहे.

इलेक्शन थाळीची किंमत

व्हेज थाळी - 1999+ टॅक्स आणि नॉन व्हेज थाळी 2299 + टॅक्स इतक्या रूपयांमध्ये उपलब्ध आहे. भारतात सात टप्प्यांमध्ये मतदान पार पडणार आहे. प्रत्येक टप्प्यातील मतदानाच्या दिवशी त्या विशिष्ट राज्यातील पदार्थ मोफत उपलब्ध करून दिले जातात. Lok Sabha Elections 2019: लोकसभा निवडणूक 7 टप्प्यामध्ये होणार, पहिला टप्पा 11 एप्रिल रोजी तर निकाल 23 मे रोजी लागणार

मतदारांना प्रोत्साहन देण्यासाठी सध्या देशभरात विविध हटके ऑफर्सचं आमिष दाखवलं जात आहे. मग तुम्ही 11 एप्रिल ते 19 मे या काळात तुम्ही दिल्लीला असाल तर खवय्यांनो एकदा या हॉटेलला भेट देऊन हटके इलेक्शन स्पेशल थाळीचा आस्वाद नक्की घ्या.