Leopard Entered In Siddharthnagar: उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगरमध्ये बिबट्याची दहशत; लोकांनी लाठ्या-काठ्या घेऊन केला स्वत:चा बचाव, पहा व्हिडिओ
Leopard Entered In Siddharthnagar (PC - X/ @fpjindia)

Leopard Entered In Siddharthnagar: सोशल मीडियावर सध्या एका बिबट्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल (Viral Video) होत आहे. या व्हिडिओमध्ये लोकांचा एक गट एका बिबट्यावर (Leopard) हल्ला करताना दिसत आहे. हा बिबट्या सोमवारी उत्तर प्रदेशच्या हटवा गावात घुसला आणि त्याने हल्ला करून अनेकांना जखमी केले. मिळालेल्या माहितीनुसार, अनेकांवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या व्हिडिओमध्ये बिबट्या लोकांवर हल्ला करताना दिसत आहे. तसेच बिबट्याच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी लोक देखील बिबट्यावर लाठीने हल्ला करताना दिसत आहेत. 30 सेकंदाच्या व्हिडिओच्या शेवटी, बिबट्या एका घरात उडी मारताना दिसत आहे. या घटनेनंतर वन परिक्षेत्र अधिकारी मोहम्मद इलियास खान आणि त्यांचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. (हेही वाचा -Leopard Attack: बिबट्याच्या हल्ल्यात मुलीचा मृत्यू, जुन्नर येथील विचलित करणारी घटना)

पहा व्हिडिओ -

बिबटयाच्या हल्ल्यामुळे सध्या गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याशिवाय, सोमवारी पहाटे दक्षिणेकडून बिबट्या गावात शिरल्याचे सांगण्यात येत आहे.