Leopard Attack: बिबट्याच्या हल्ल्यात मुलीचा मृत्यू, जुन्नर येथील विचलित करणारी घटना
Leapard Attack : PC PIXABAY

Leopard Attack: `पुणे जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बिबट्याच्या हल्ल्यात एका चिमुकलीने आपले प्राण गमावले आहे.ही घटना पहाटे जुन्नर तालुक्यात घडली आहे. बिबट्याने हल्ला केला होता त्यात चिमुकलीची मृत्यू झाला. बिबट्याच्या या हल्ल्याचा घटनेमुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. दरम्यान बिबट्या हल्ल्याचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र दिसत आहे.  (हेही वाचा- वन विभागाच्या अधिकाऱ्याकडून बिबट्या जेरबंद

मिळालेल्या माहितीनुसार, जुन्नर तालुक्यातील शिरोली खुर्द गावात ही घटना घडली. गावातील शेतात एक कुटुंब वास्तवास होते. संपत मोरे या शेतकऱ्याचे शेतात एक धनगर कुटुंब राहत आहे. मुलगी बेपत्ता होती त्यामुळे शोधाशोध घेतली. तेव्हा आज पहाटे 11 एप्रिल रोजी संपत यांच्या लहान मुलीचा मृतदेह शेतात सापडला होता. पीडित मुलीला बिबट्याच्या हल्ल्याचा सामना करावा लागला. संस्कृती कुळेकर असं मृत चिमुकलीचे नाव आहे.

बिबट्याच्या हल्ल्यात संस्कृतीचा जागीच मृत्यू झाला. शेतापासून अर्धा किलोमीटर अंतरावर चिमुकलीचा मृतदेह आढळला. या घटनेची माहिती गावात पसरताच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गावकऱ्यांनी सांगितले की,  बिबट्याच्या हल्ल्याचे प्रमाण वाढत असल्याचे समोर आले आहे. या घटनेची माहिती पोलिसांनी घेतली आहे. या विचलित करणाऱ्या घटनेमुळे कुळेकर यांच्या कुटुंबियांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे.