Leopard Viral Video: बिबट्याला सहसा धोकादायक मानले जातात, कारण ते अतिशय हुशारीने मानव आणि प्राणी यांची शिकार करू शकतात.बऱ्याचदा वेळा बिबट्या जंगलात फिरून रहिवासी भागात पोहोचतात आणि तिथे दहशत पसरवतात. देशाच्या विविध भागातून बिबट्यांबद्दल बर्याच बातम्या येत आहेत पण मनुष्यांनी बिबळ्यांना त्रास दिलेला तुम्ही कधी पाहिले आहे काय? वाटले ना आश्चर्य? होय, असाच एक धक्कादायक व्हिडिओ हिमाचल प्रदेशातून समोर आला आहे.ज्यात जंगलातून फिरत असलेला बिबट्या रस्त्यावर लोकांपर्यंत पोहोचला.परंतु येथे सर्वात धक्कादायक बाब म्हणजे घाबरलेल्या लोकांनी पळ काढण्याऐवजी त्याला त्रास देणे सुरू केले. हा व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ( अखेर 157 वेळा ड्रायव्हिंगसाठी परिक्षा दिल्यानंतर Learner Test मध्ये मिळाले यश )
हा व्हिडिओ भारतीय वन सेवा अधिकारी वैभव सिंह (Vaibhav Singh) यांनी ट्विटरवर पोस्ट केला आहे. यासह त्याने कॅप्शन लिहिले आहे '' हिमाचलमध्ये कुठे तरी, लहान बिबट्याला प्राण्यांच्या कळपाने त्रास दिला आहे. व्हिडिओ सामायिक केल्याच्या काही मिनिटांनंतरया व्हिडिओला बरेच व्यूज मिळाले आणि आता हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. सामायिक केल्याच्या एका तासात जवळपास साडेसातशे व्यूज मिळाली आहेत. कुल्लू जिल्ह्यातील ग्रेट हिमालयन राष्ट्रीय उद्यानाजवळ ही घटना असल्याचे सांगण्यात येत आहे. (पाकिस्तान मधील कराची मध्ये पार पडला 50 हिंदू जोडप्यांचा सामूहिक विवाह सोहळा ( Watch Video)
Somewhere in Himachal, a gentleman #leopard is being harassed by a bunch of animals !! VC:SM pic.twitter.com/VyDXuH6c5h
— Vaibhav Singh,IFS (@VaibhavSinghIFS) January 14, 2021
बिबट्या चालत लोकांकडे कसा येतो हे व्हिडिओमध्येआपण पाहू शकतो . बिबट्याला पाहून रस्त्यावरून जाणारी वाहने तिथेच थांबतात आणि तिथे उपस्थित लोक बिबट्याचे फोटो त्यांच्या कॅमेरात टिपण्यास सुरूवात करतात. त्यांच्यामध्ये बिबट्या पाहून लोकांना कोणत्याही प्रकारची भीती वाटत नाही उलट ते बिबट्याला त्रास देत मजा करताना दिसत आहेत.लोकांची मजा पाहून बिबट्या अस्वस्थ झाला आहे आणि तो तेथील लोकांमध्ये जाताना दिसत आहे तेव्हा काही लोक त्याच्यापासून पळून जातात .आणि दोन व्यक्ती तिथे उभे आहेत त्यातील एकावर बिबट्या चढण्याचा प्रयत्नही करताना दिसत आहे.