लता मंगेशकर यांच्याकडून Mozart's 40th Symphony भारतीय सरगम मध्ये सादर करणार्‍या Samadipta Mukherjee च्या पाठीवर कौतुकाची थाप अन आशिर्वाद!
Samadipta Mukherjee and Lata Mangeshkar | Photo Credits: Facebook

संगीताला कशाचंच बंधन नसतं हे तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. पण त्याचा अनुभव अनेक कलाकार क्षणोक्षणी त्यांच्या साधानेतून घेत असतात. सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत असलेला समदिप्ता मुखर्जी (Samadipta Mukherjee) या तरूण गायिकेचा व्हिडिओदेखील त्याचीच प्रचिती देणारा आहे. ऑस्ट्रियन संगीतकार मोझार्ट (Mozart) यांच्या 40 व्य संगीत रचनेला हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतप्रकारामधील सरगम मध्ये बांधून सादर करण्याचा प्रयत्न समदिप्ता हिने केला आहे. दरम्यान त्याला भारताची गानकोकिळा लता मंगेशकर (Lata Mnageshkar) यांनी कौतुकाची थाप देत प्रोत्साहन दिले आहे.

लता मंगेशकर यांनी ट्विटरवर समदिप्ताचा व्हिडिओ शेअर करत," नमस्कार, मला हा व्हिडीओ मिळालाआहे. या मुलीने ऑस्ट्रियातील महान संगीतकार मोझार्ट यांच्या 40 वी संगीतरचना G minor ला भारतीय सरगम मध्ये अत्यंत सुंदर गायलं आहे. ही एक उत्तम गायिका व्हावी यासाठी माझ्याकडून आशिर्वाद" असे लिहले आहे.

लता मंगेशकर यांचे ट्वीट

Samadipta Mukherjee चे ट्वीट

समदिप्तानेदेखील लता दीदींचे आभार मानत 'स्वप्न सत्यात उतरल्याची' भावना व्यक्त केली आहे.

लता मंगेशकरांनी ट्विट पोस्ट करताच सुरूवातीच्या तासाभरातच समदिप्तावर कौतुकाचा वर्षाव सुरू झाला. दरम्यान 65 हजारांपेक्षा अधिक व्हुज आणि 18 हजारांपेक्षा अधिक लाईक्स होते. नेटकर्‍यांनी देखील समदिप्ताच्या अनोख्या फ्जुजनचं कौतुक केले आहे.

समदिप्ताने पहिल्यांदा वर्ल्ड म्युझिक डे दिवशी (21 जून) पहिल्यांदा फेसबूकवर व्हिडिओ पोस्ट केला होता. मोझार्ट यांनी वयाच्या 5 व्या वर्षापासून संगीत रचना बांधण्यास सुरूवात केली. 600 पेक्षा अधिक रचना त्यांनी आपल्या आयुष्यात बांधल्या आहेत.