सोशल मीडियावर(Social Media) नेहमीच असे काही व्हिडिओ पाहायला मिळतात की पाहताक्षणी लक्ष वेधून घेतात. त्यापैकी काही व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होतात. काही आश्चर्य वाटावे असे असतात तर काही इतके विचित्र असतात की हसू आल्याशिवाय राहात नाही. सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यात व्हिडिओ पाहताच आपल्याला हसू येते. हा व्हिडिओ एका डान्सप्रेमीचा आहे. त्याचा डान्स पाहून 'दे माय धरणी ठाय' असेच काहीसे क्षणभर वाटून जाते.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत आपण पाहू शकता एक दोन व्यक्ती एका दुकानात डान्स करत आहेत. बहुदा दुकान वरच्या मजल्यावर असावे किंवा दुकानात खाली एखादे तळघर असावे. त्यावर प्लायवूडचे छत बणवून वापर केला जात असावा. दोघांपैकी एकजण काहीसा विचित्र पद्धतीने डान्स करत असतो. डान्स करता करता चक्क खालचे छतच तुटते आणि तो थेट खाली निर्माण झालेल्या खडड्यात पडतो. डान्स करणारा हा व्यक्ती इतका खडड्यात पडतो की त्याचे केवळ डोकेच वर दिसू लागते. सोशल मीडियावर या व्हिडिओवरुन जोरदार प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. (हेही वाचा, 'रात्रीस खेळ चाले 2’ मधील वच्छीचा 'नागिन डान्स' व्हायरल, तुम्ही पाहिलात का? (Watch Video) )
हा व्हायरल व्हिडिओ नेमका कुठला आहे याबाबत पुष्टी होऊ शकली नाही. मात्र, सोशल मीडियावर तो व्हायरल होतो आहे. व्हिडिओ पाहून काहीयूजर्सनी प्रतिक्रिया दिली आहे की, काही म्हणा. पण पट्ट्याने फ्लोअर हालवून सोडला. हा व्हिडिओ एडिटेड आहे की वास्तवातील याचीही पुष्टी होऊ शकली नाही.. viralhog नावाच्या एका इन्स्टाग्राम पेजवर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. आतापर्यंत तीन हजारांहून अधिक युजर्सनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. व्ह्यूवजची संख्याही त्याच्या आसपासच आहे.