दुर्गा पूजेचा (Durga Puja) उत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) दुर्गा पूजेचा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. त्यामुळे कोविड-19 (Covid-19) संकटातही दुर्गेच्या आगमनाची उत्सुकता नागरिकांमध्ये आहे. दरम्यान, यंदा कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक स्थलांतरीत मजूर महिला स्वगृही परतण्यासाठी आपल्या मुलाबाळांसह शेकडो किमी पायी चालल्या. या कठीण प्रसंगाला धैर्याने सामोरे जाणाऱ्या आणि मुलांची काळजी घेत पायपीट करणाऱ्या प्रत्येक महिलेत दुर्गेचा अंश एका मुर्तीकाराला दिसला आहे. आणि त्याच्या कलात्मक नजरेतून त्याने दुर्गेचे अनोखे रुप साकारले आहे.
कोलकाता (Kolkata) येथील बेहला (Behala) मधील बरीशा क्लब दुर्गा पूजा समितीने (Barisha Club Durga Puja Committee) दुर्गेची पारंपारीक मुर्ती बदलून मुलांना घेऊन जाणारी स्थलांतरीत मजूर महिलेची मुर्ती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. केवळ दुर्गाच नाही तर तिचं मुलं सरस्वती लक्ष्मी (लोकखी) आणि गणेश यांच्या मुर्तीही बदलण्यात येणार आहेत. ही अनोखी मुर्ती पल्लब भौमिक (Pallab Bhowmick) यांनी साकारली आहे. अत्यंत सुबक, बोलकी अशी ही देवीची मुर्ती नक्कीच लक्षवेधी आहे. तिच्या अष्टभूजा असलेली मजूर महिला आपल्या मुलाबाळांसह पाहायला मिळत आहे. (COVID-19 Pandemic सोबत यंदा शारदीय नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी हा आगामी सणासुदीचा काळ सेलिब्रेट करताना सुरक्षित राहण्यासाठी या 5 गोष्टींबाबत दक्ष रहाच!)
पहा फोटो:
Pallab Bhowmick's Ma Durga for the Pujo this year, as a migrant worker with her children.
Very evocative. pic.twitter.com/aAlJVI9XKO
— Joy Bhattacharjya (@joybhattacharj) October 16, 2020
टेलिग्राम वरील रिपोर्टनुसार, दुर्गेची ही अनोखी मुर्ती साकारणाऱ्या कलाकाराने म्हटले, "अत्यंत दारिद्रय, उपासमारी आणि रणरणते ऊन या कठीण प्रसंगालाही आपल्या मुलांसमवेत सामोरे जाणाऱ्या स्त्री मध्ये देवी आहे. ती आपल्या मुलांसाठी अन्न, पाणी आणि घटकाभरच्या विश्रांतीच्या शोधात आहे."