King Cobra ला चक्क हाताने धरून बरणीत भरणाऱ्या महिलेचा व्हिडीओ होतोय व्हायरल, हिंमत बघून व्हाल थक्क (Watch Video)
King Kobra Held By Bare Hands (Photo Credits: Youtube)

King Cobra Caught With Bare Hands: सर्वात विषारी म्हणून ओळखला जाणारा किंग कोबरा (King Kobra)  साप चक्क हाताने उचलून बरणीत बंद करणाऱ्या एका महिलेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल (Viral Video) होत आहे. ज्या सापाला नुसतं बघून भल्याभल्याना कापरं भरेल. अगदी नाजूक हृदय असेल तर एखाद्याचा जीव ही धोक्यात येईल अशा सापाला न घाबरता हाताने उचलणाऱ्या या महिलेला पाहून नेटकरी थक्क झाले आहेत. या महिलेने हातात काहीही घातलेले नाही उघड्या हातानेच ती त्या सापाला उचलत आहे. Coronavirus Lockdown: अरुणाचल प्रदेशात लॉकडाउनच्या काळात शिकाऱ्यांकडून किंग कोब्रा जातीच्या सापाची हत्या

या व्हिडीओ मध्ये तुम्ही पाहू शकता की किंग कोब्रा हा साप रस्त्यात पडलेला आहे. या सापाला पकडण्यासाठी ही महिला पुढे येते. आपल्या हाताने ती कोणाचीही मदत न घेता या सापाला उचलण्याचा प्रयत्न करत असते, सुरुवातीला हा साप तिच्या हातून सटकण्याचा प्रयत्न करताना दिसतो मात्र अगदी अलगद त्याला उचलून ही महिला एका बरणीत बंद करते. यापूर्वी ही असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले होते. एका व्हिडीओ मध्ये तर चक्क एक इसम सापाला आंघोळ घालताना पाहायला मिळाला होता.

पहा व्हिडीओ

तुम्हाला ठाऊकच असेल की ,किंग कोबरा हा अत्यंत बुद्धिमान साप म्हणून ओळखला जातो. हा साप महाविषारी आहे जर का त्याने कोणाला डंख केला तर त्याचा मृत्यू अटळच मानला जातो. त्याचा वेग हा अन्य सापांच्या तुलनेत खूप जास्त असतो, एकूणच हा साप महाभयंकर म्हंटल तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. त्यामुळेच हा व्हिडीओ पाहून उत्साहात येऊन कधीही असं कोणताही धाडस तुम्ही करण्याचा विचारही करू नका.