Coronavirus Lockdown: अरुणाचल प्रदेशात लॉकडाउनच्या काळात शिकाऱ्यांकडून किंग कोब्रा जातीच्या सापाची हत्या
Arunachal Pradesh Hunters (Photo Credits: Video screengrab)

अरुणाचल प्रदेशात काही व्यक्तींनी किंग कोब्राची हत्या केल्याच व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाला असून बहुतांश जणांनी तो शेअर केला आहे. व्हिडिओत तीन व्यक्तींच्या खांद्यावरील किंग कोब्रा असल्याचे दिसून येत आहे. तर NDTV यांनी दिलेल्या वृत्तानुसार, त्या व्यक्तीपैकी एकाने असे म्हटले आहे की, जंगलात काहीतरी शोधत असताना त्यांना किंग कोब्रा दिसला. या प्रकरणी वन्यजीव संरक्षण कायद्यांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींनी पळ काढला आहे. यापूर्वीच्या रिपोर्टमध्ये असे सांगण्यात आले होते की, लॉकडाउनच्या काळात खाण्यासाठी अन्न नाही म्हणून त्यांनी किंग कोब्राची हत्या करुन खाल्ले. मात्र यावर आता अरुणाचल प्रदेशातील प्रशासनाने स्पष्टीकरण दिले आहे.

अरुणाचल प्रशासनाने असे म्हटले आहे की, आमच्याकडे भाताची कमतरता नाही आहे. राज्याला तीन महिने पुरेल ऐवढा साठा असून उदाहनिर्वाह गमावलेल्या नागरिकांना फुकटात राशन दिले जात आहे. जवळजवळ 20 हजार लोकांना आतापर्यंत फ्री राशन दिले असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

अरुणाचल प्रदेश (Arunachal Pradesh) राज्यातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये ऐकायला मिळते की, घरात खायला अन्नच शिल्लख राहिले नाही. त्यामुळे खाण्यासाठी हा साप जंगलात मारला आहे. व्हिडिओत तीन लोक सुमारे 12 फूट लांबीचा साप खांद्यावर घेतलेलेही दिसतात. हा साप किंग कोब्रा (King Cobra) जातीचा असल्याचे वृत्त आहे.

सोशल मीडियात व्हायरल झालेला व्हिडिओ:

दरम्यान, व्हिडिओत दिसणाऱ्या लोकांनी जेवणाची पूर्ण तयारी केली होती. तसेच, सापाचे तुकडे स्वच्छ करण्यासाठी विशिष्ट झाडांच्या पानाचीही व्यवस्था केली होती. या व्हायरस व्हिडिओत लोकांना एकमेकांशी बोलताना दिसते की, कोरोना व्हायरस संकटामुळे देशभरात असलेल्या लॉकडाऊनमुळे घरात खायला ना तांदूळ आहे ना धान्य. घरात खायला काहीच शिल्लख नसल्याने आम्ही जंगलात गेलो असल्याचे म्हटले होते. खाण्यासाठी काही शोधत असताना आम्हाला हा किंग कोब्रा मिळाला. (हेही वाचा, VIDEO: कोविड 19 च्या नावाने उपवास; चक्क 'कोरोना दावत'; तामिळनाडू पोलिसांकडून आयोजकास अटक)

दरम्यान, वन्य अधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे की, साप मारल्याबद्दल संबंधित लोकांवर वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत कारवाई करुन गुन्हा दाखल केला आहे. तिनही आरोपी फरार झाले आहेत. किंग कोब्रा हा साप संरक्षीत जीव प्रकारात येतो. त्यामुळे अशा प्राण्यांची हत्या करणे हा अजामीनपात्र गुन्हा मानला जातो.