Kim Kardashian Bold Photo: उत्पादनांची जाहिरात करताना किम कर्दाशिअनने घडवले आपल्या स्तनांचे दर्शन; भल्या भल्यांची उडाली झोप (Photo)
Kim Kardashian (Photo Credits: Instagram)

रियालीटी टीव्ही स्टार किम कर्दाशिअनने (Kim Kardashian), नुकतेच आपली शेपवेअर लाईन स्किम्सची दोन नवीन उत्पादने बाजारात आणल्याची घोषणा केली होती. बॉडी टेप आणि पेस्टी (Body Tape And Pasties) ही ती दोन उत्पादने आहेत. तिने तिच्या नवीन उत्पादनांचा कसा उपयोग करावा, हे लोकांना दाखवण्यासाठी आपल्या स्तनांचा वापर केला आहे. ही उत्पादने स्वतः परिधान केलेला एक फोटो तिने सोशल मिडीयावर शेअर केला आहे. सध्या याच फोटोची चर्चा चालू आहे. स्कीम्स वेबसाइटवर गुरुवारपासून ही उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत.

Kim Kardashian Bold Photo -

किमची ही दोन्ही उत्प्दाने स्वेटप्रुफ आणि स्ट्रेचेबळ आहेत. आपल्या स्तनांवर तिने ही उत्पादने परिधान केली आहेत. यामध्ये तिने स्तनाग्र सोडून आपल्या शरीराच्या वरील संपूर्ण भागाचे दर्शन चाहत्यांना घडवले आहे. स्किम्सच्या प्रतिनिधींनी सांगितले की, बॉडी टेप आणि पेस्टीज केवळ स्तनांसाठी डिझाइन केल्या गेल्या आहेत. ही दोन्ही उत्पादने तीन रंगांमध्ये उपलब्ध असतील.

(हेही वाचा: 38 व्या वर्षी Kim Kardashian चौथ्यांदा बनली आई; Mother’s Day च्या पार्श्वभूमीवर झाले मुलाचे आगमन)

बॉडी टेप कशा वापरायच्या यासाठी किमने एक व्हिडीओही शेअर केला आहे. यामध्ये वापरकर्त्यांना प्रत्येक स्तनाच्या खाली पासून, खांद्याच्या वरच्या बाजूस टेपची एक 16 इंची पट्टी लावण्याची सूचना दिली आहे. याच्या जाहिरातीसाठी किमने लॉस एंजेलिसमधील 2017 सालच्या एका इव्हेंटमधील एक फोटो वापरला आहे, जिथे तिने मोठ्या आकाराच्या ब्लेझर लुकमध्ये ही उत्पादने परिधान केली आहेत.

भलेही किम इथे तिच्या उत्पादनांची जाहिरात करत असो, मात्र तिचा हा लुक चाहत्यांना प्रचंड आवडला आहे. दरम्यान, किम ही 2018 सालची इंटरनेटवर सर्च केली जाणारी सर्वात धोकादायक सेलिब्रिटी ठरली आहे. आपला हॉट अंदाज आणि सेक्सी अदांसाठी किम प्रसिद्ध आहे. म्हणूनच इंटरनेटवर तिच्यासंबंधी माहिती आणि बातम्या सर्वात जास्त सर्च केल्या जातात.